मुंबई, 30 एप्रिल : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काय म्हणाले शरद पवार? “बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही.
बारसू रीफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. pic.twitter.com/iihotJPEds
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 30, 2023
चर्चेतून मार्ग काढायला हवा : पवार बारसू रिफायनरी बाबत चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून बारसू रिफायनरीचा आढावा घेतला. कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. रिफायनरी आंदोलकांचे प्रश्न सोडले पाहिजेत. चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला मी दिला आहे. बारसूतील रिफायनरी बाबत चर्चा करायला हवी. अशं पवार पत्रकार परिषदमध्ये म्हणाले होते. वाचा - दिल्लीतून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी; राऊतांनंतर ठाकरे गटाच्या आणखी एका मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी पोलीस बळाचा वापर झाल्यासंबंधीही बोलणं झालं. त्यावर त्यांनी आम्ही आता कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे. सध्या फक्त जमिनीची तपासणी करत असून त्यासाठी लोक विरोध करत होते. पण आता त्यांचा विरोध नाही. लोकांना समजावून सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली," असं शरद पवार यांनी सांगितलं. काय आहे प्रकरण? कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्यानंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच ठेण्यात आलं आहे. अनेक आंदोलक सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या मांडून होते. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे.