नाना पटोले
मुंबई, 25 एप्रिल : राजापूर रिफायनरीसाठी सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध केला जात असून यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून आंदोलन करणाऱ्या स्थानिकांना इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केलीय. महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकार ल जनतेशी घेणं देणं नाही. हम करे सो कायदा अशी परिस्थिती आहे असं नाना पटोले म्हणाले. बरसू प्रकल्प झालं पाहिजे, पण कुठे झालं पाहिजे याचे काही संकेत आहेत. मी आंदोलनकर्ते आणि विरोधकांशी बोललो होतो. कोकणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे. हा प्रश्न मी सभागृहात विचारला होता. यात एका पत्रकाराच जीव गेला. जनतेच्या मताला चिरडून टाकण्याचा काम सरकार करत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पण पर्यावरण महत्वाचं आहे. सरकारने दोन्ही बाजूच म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यावर तोडगा काढावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक, सर्वेक्षणासाठी 1800 पोलीस तैनात मी काल जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून मध्य मार्ग काढण्याचा सूचना केल्या आहेत. पण राज्यात सरकार बिल्डरचं आहे. महिलांना घराबाहेर काढतानाच दुर्दैवी चित्र आहे. काँग्रेस या प्रकल्पाच्या विरोधात नाही. मात्र यांच्या बगलबच्च्यांनी तिथे जमिनी घेतल्या म्हणून जबरदस्ती केली जात आहे. मी पावसाळ्यात आंदोलन पाहिलं. हजारो महिला पावसात भिजत आंदोलन करत होत्या हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पोलीस आंदोलन चिरडत असतील तर जलियान वाला बागसारखी घटना होईल हे संजय राऊत यांचं म्हणण बरोबर आहे असेही पटोले यांनी म्हटलं. मुख्यमंत्री कोण आहे, ते नाराज आहे का याच्याशी काँग्रेसला काही घेणे देणे नाही. राज्यात अनेक प्रश्न आहे, तरुणाचे, बेरोजगारांचे प्रश्न आहे. निवडणूक आली की कोण मुख्यमंत्री हे पाहू. सध्या जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताने झालेल्या मृत्यू प्रकरणावरूनही नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, खारघर प्रश्नावर सरकारने माफी मागायला हवी. सरकार हिंदूंचं आहे. तर धर्माधिकारी हिंदू नाहीत का, हिंदूंना मारण्याचे काम सरकार करत आहे. धनगेकरच अजितदादांबाबत वैयक्तिक मत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. जो भाजप विरोधात लढेल त्याला आम्ही सोबत घेऊन लढू असेही पटोले यांनी म्हटलं. अदानी कंपनीत राज्यातील नेत्यांचे शेअर्स असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले की, पवार परिवाराचे कुठे कुठे शेयर आहे हे मला माहिती नाही. मी काही जासुस नाही कोणाचे किती कुठे शेयर आहे हे पाहायला.