JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजितदादांनी उडवला धुरळा, 'मातोश्री'वरही तापलं वातावरण, दिल्लीतला मोठा नेता भेटीला!

अजितदादांनी उडवला धुरळा, 'मातोश्री'वरही तापलं वातावरण, दिल्लीतला मोठा नेता भेटीला!

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मातोश्रीवरही घडामोडींना वेग आला आहे.

जाहिरात

मातोश्रीवर खलबतं, काँग्रेस नेत्यांची ठाकरेंसोबत बैठक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मातोश्रीवरही घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीहून काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. केसी वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.

या भेटीसाठी केसी वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे. या भेटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्व विरोधी पक्षांची एकजूट व्हावी, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीमध्ये ज्या मुद्द्यांबाबत मतभेद आहे, या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींबाबत उघड नाराजी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या