राज्य सरकारकडून मदत जाहीर
उदय जाधव, मुंबई, 29 जुलै : बुलढाण्यात पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मलकापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर दोन खाजगी बसचा अपघात झाला. दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.
ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा सातवर; अंगावर काटा आणणारे अपघाताचे photosजखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
या दुर्घटनेत या अपघातामध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 25 ते 30 प्रवासी जखमी आहेत. दरम्यान जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 5 जण ठार, 30 जखमीमलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर हा अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. यातील एक ट्रॅव्हल्स ही तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेनं येत होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 भाविक होते.