JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लाथाबुक्क्यांच्या मारहाणीविरोधात उगारला चॉपर; जळगावमध्ये दोन गटात हाणामारी; पाच जणं जखमी

लाथाबुक्क्यांच्या मारहाणीविरोधात उगारला चॉपर; जळगावमध्ये दोन गटात हाणामारी; पाच जणं जखमी

या प्रकरणी पहाटे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 8 एप्रिल : जळगावमधील कांचननगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत चॉपर, लोखंडी पट्टी आणि विटांचा वापर करण्यात आल्यामुळे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पहाटे शनिपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चॉपर, विळ्याने संतोष रमेश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार तीन जणांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा हितेश व आकाश मराठे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर तिघांनी त्यांच्यावर चॉपरने वार करून जखमी केले. शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिंदे यांच्या तक्रारीनुसार तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातही गँगवॉर… पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून दोन गटातील हाणामारीच्या घटना वारंवार समोर यत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. शहरात पुन्हा एकदा कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरात तर गेल्या काही दिवसांपासून गँगवॉर टोकाला गेले आहे. खूनाचा बदला खून म्हणत सराईत गुन्हेगारांकडून आरोपीवर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर शहरात खळबळ माजली आहे. नशेसाठी तळीराम करताय औषधीचा उपयोग, पाहा, पोलिसांनी काय केलं? या प्रकरणी ओम उर्फ पिंटू भंडारी (वय 23), सागर घायतडक (वय 19) राजन लवांड (वय 22), मेघराज शितोळे या चौघांविरुदध हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला. आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील दोन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि शुभम भोंडे हे दोघे हडपसर येथील सरकारी 32 शाळा येथे सिगारेट ओढून रिक्षाने घरी जात असताना त्यांच्या समोर दोन दुचाकीवर चौघे आले. शुभम भोंडे हा सन 2020 मध्ये अनिकेत शिवाजी घायतडक याचे खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता. सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे. त्याचा राग मनात धरुन आरोपी यांनी हातामध्ये धारधार शस्त्रे घेवुन शुभम याला रिक्षाच्या बाहेर ओढून, त्याला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डरने रिप्लाय देणार किंवा मला 5 लाख रुपये दे. आज तुला कायमचे संपवुनच टाकणार असे बोलून धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर व पाठीवर वार केले. जर कोणी मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असे बोलून दहशत निर्माण करुन निघून गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या