अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 10 मे : मे महिन्यातील ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि थंडीचा अनुभव राज्यातील अनेक भागात येत आहे. पाऊस आणि गारपीटीमुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी याबाबत हवामान विभागानं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 10 ते 14 मे या कालावधीसाठी हवामान विभागानं ही सूचना केली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक कृषी विज्ञान विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी हवामान केंद्र यांच्या वतीने देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांनो, अशी घ्या काळजी पशुसंवर्धन:सध्यस्थितीत गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्याना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. उन्हाळी मका: (दाणे भरणे अवस्था):मका पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे मोसंबी (फळवाढी अवस्था):मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेत रसशोषन करणा-या किडींचा प्रादुर्भाव वाढला असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 टक्के ईसी 13 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. उन्हामध्ये फवारणी करू नये. आल्याला का आला सोन्याचा भाव? शेतकरी राजा खूश पण बाजारात नेमकं घडलं काय? Video डाळिंब (मृग बहार अवस्था):मृग बहार लवकर घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफॉन 39 % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी. त्यानंतर हलकी छाटणी करून घ्यावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून 10 ते 15 सेंटी मीटरपर्यंत छाटाव्यात. बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी. भाजीपाला (फुलधारणा ते फळधारणा अवस्था):टोमॅटो पिकावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील 15 मिली + करंज तेल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकाची काढणी शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी करावी.