JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : पावसाळयात गरम गरम भज्यांवर ताव मारायचाय? यापेक्षा टेस्टी भजी कुठेच नाही मिळणार, पाहा Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : पावसाळयात गरम गरम भज्यांवर ताव मारायचाय? यापेक्षा टेस्टी भजी कुठेच नाही मिळणार, पाहा Video

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये टेस्टी भजी हे सुप्रसिद्ध आहेत. यामुळे नागरिक गर्दी करून येथील भज्यांचा आस्वाद घेतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 6 जुलै : पावसाळा सुरू झालेला आहे सर्वत्र पाऊस पडत आहे. अशा मध्येच पाऊस पडत असताना गरम गरम भजी खायची सर्वांनाच इच्छा होते. अनेक ठिकाणी वेगवेगळे पद्धतीची भजी खाण्यासाठी मिळतात.  छत्रपती संभाजीनगर शहरामध्येही जे टावर या भागामध्ये उस्मान भाईचे टेस्टी भजी हे सुप्रसिद्ध आहेत. यामुळे नागरिक गर्दी करून येथील भज्यांचा आस्वाद घेतात. कशी झाली सुरुवात? उस्मान भाई हे आधी एका हॉटेलमध्ये काम करायचे त्यांनी तिथे थोडे दिवस काम केलं. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना आपण पण आपला छोटासा व्यवसाय सुरू करावा असं वाटलं. म्हणून त्यांनी टेस्टी भजी हे दुकान सुरू केलं. 45 वर्षांपासून ते या भज्यांचा व्यवसाय करतात. शहरातील जे टॉवर पदमपुरा भागामध्ये त्यांचं टेस्टी भजी या नावाने दुकान सुरू आहे.

चवीमध्ये कोणतेही तडजोड नाही मी गेल्या 45 वर्षांपासून भजी व्यवसाय करतोय. इथे सुरुवातीला भजी ही 25 पैशाला भेटायचे आता भज्यांची किंमत ही 20 रुपये झालेली आहे. महागाई वाढली तसेच सर्व साहित्यांचे दर वाढल्यामुळे आम्ही ही दरवाढ केली आहे. ग्राहकांना इथली भज्यांची चव खूप आवडते म्हणून इथे ग्राहक भजी खाण्यासाठी येतात. आमच्याकडे मोठमोठ्या राजकारणी लोकांपासून ते सिनेकलाकार सर्वजण इथे भजी खाण्यासाठी येतात. महागाई वाढली तरी आम्ही भज्यांच्या चवीमध्ये कोणतेही तडजोड केलेली नाही पहिले जशी होती आता सुद्धा तशीच चव आहे, असं मालक उस्मान भाई सांगतात. इथली चव खूप अप्रतिम मी इथे नेहमीच भजी खायला येतो. माझं घर हे शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे तरीसुद्धा मला इथले भजी खूप आवडतात. त्यासाठी मी आठवड्यातून एकदा तरी नक्की हे भजी खाण्यासाठी येतोच. इथली चव ही खूप अप्रतिम आहे, असं ग्राहक अरुण मोरे सांगतात.

Solapur News: सोलापूरची वर्ल्ड फेमस मटण खारीबोटी कशी तयार करतात? पाहा Recipe Video

संबंधित बातम्या

चवीमध्ये बदल नाही जेव्हापासून हे दुकान सुरू आहे. तेव्हापासून इथे मी भजी खाण्यासाठी येतो. इथल्या भज्यांची चव ही पहिले जशी होती आत्ता पण तशीच आहे. महागाई जरी वाढली तरी यांनी चवीमध्ये बदल केलेला नाहीये, असं ग्राहक आदिनाथ खरात सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या