जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Solapur News: सोलापूरची वर्ल्ड फेमस मटण खारीबोटी कशी तयार करतात? पाहा Recipe Video

Solapur News: सोलापूरची वर्ल्ड फेमस मटण खारीबोटी कशी तयार करतात? पाहा Recipe Video

Solapur News:  सोलापूरची वर्ल्ड फेमस मटण खारीबोटी कशी तयार करतात? पाहा Recipe Video

पाहुणेमंडळी सोलापूरमध्ये आली की त्यांना मटण खारीबोटीची हमखास आठवण होते. ही डिश कशी तयार करतात?

  • -MIN READ Solapur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर, 4 जुलै : भिन्न संस्कृतीचं शहर असलेल्या सोलापूरमधील खाद्य संस्कृतीमध्येही विविधता आहे. सोलापूरमधील अनेक पदार्थ राज्यात फेमस आहेत. मटण खारीबोटी हा सोलापुरी पदार्थही नॉनव्हेजप्रेमींमध्ये चांगलाच फेमस आहे. ही डिश कशी बनते ते पाहूया कशी तयार करतात मटण खारीबोटी? सुरुवातीला एका बाऊलमध्ये मटण घेऊन ते स्वच्छ धुऊन घेतात. त्यानंतर कुकरमध्ये हळद मीठ टाकून ते व्यवस्थितपणे शिजवून घेतले जाते. मटन शिजवून राहिलेले पाणी बाजूला काढून ते मटण सूप किंवा पुढे रेसिपीच्या भागात वापरले जाते. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल कांदा अद्रक लसूणची पेस्ट, मीठ आणि खोबरे टाकून फ्राय केले जाते. तयार मसाल्यामध्ये शिजलेले मटण टाकून पॅनमध्ये पूर्वीचे मिश्रण आणि आता टाकलेले मटण हे व्यवस्थितपणे एकजीव केले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

मटण शिजवताना काढलेले पाणी हे या मिश्रणामध्ये टाकून अलगद शिजवून घेतले जाते. यामुळे खारीबोटीसाठी टाकलेला मसाला हा मटणासोबत एकजीव होऊन व्यवस्थितपणे शिजला जातो. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ही डिश खाण्यासाठी तयार होते. सोलापूर सोडून इतर ठिकाणी या डिशला मटण आळणी किंवा चिकन आळणी देखील म्हंटले जाते. मुंबईच्या वडापावला सोलापूरची टक्कर, खास खर्डा चटणीही केली मिक्स; दुकानात लागल्या रांगा VIDEO सोलापूरकरांना मटण म्हणजे झणझणीत आणि तिखट खायला आवडते परंतु मटन खारीबोटी खाण्याची चवच वेगळी आहे. बाहेरून अनेक पाहुणेमंडळी सोलापूरकरांना मटण खारीबोटी बनविण्याचा आग्रह धरतात. शिवाय कमी वेळेत आणि कमी मसाले वापरून बनवलेली ही डिश खायला फारच टेस्टी आहे, अशी माहिती हॉटेल जाधवांचा वाडाचे मालक शैलेश जाधव यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात