JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati sambhajinagar : फेसबुकवर फॉलोअर्स अन् फ्रेंड वाढल्याने पती-पत्नीमध्ये वाद, रिल्समुळे हिंसाचार अन् घटस्फोट वाढले

Chhatrapati sambhajinagar : फेसबुकवर फॉलोअर्स अन् फ्रेंड वाढल्याने पती-पत्नीमध्ये वाद, रिल्समुळे हिंसाचार अन् घटस्फोट वाढले

Chhatrapati sambhajinagar : सोशल मीडियावर फॉलोवर्स फ्रेंड का वाढले म्हणत पती-पत्नीत वाद होत असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर यातून काही प्रकरणे चक्क घटस्फोटापर्यंत देखील गेल्याचे देखील समोर आले आहे.

जाहिरात

सोशल मीडियामुळे पती-पत्नीत वाद, घटस्फोटापर्यंत पोहचतायत प्रकरणे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै : आजच्या युगात सोशल मीडियाने सर्वांनाच वेड लावले आहे. सोशल मीडियामुळे अनेक फायदे होत असले, तरी त्याचे दुष्परिणाम देखील दिसून येत आहेत. अशातच सोशल मीडियावर फॉलोवर्स फ्रेंड का वाढले म्हणत पती-पत्नीत वाद होत असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर यातून काही प्रकरणे चक्क घटस्फोटापर्यंत देखील गेल्याचे देखील समोर आले आहे. सोशल मीडियाने तरुणाईसह अनेकांना वेड लावले याचा वापर करून अनेकांनी व्यवसायाला गती दिली तर नवीन ट्रेनच्या माध्यमातून काहींचा आर्थिक स्तर देखील उंचावला आहे. दुसरीकडे याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. सोशल मीडियावर रिल्स का बनवतेस ? तुझे इन्स्टाचे फॉलोवर्स, फेसबुकचे मित्र कसे वाढले ? असे म्हटल्यावरून पती-पत्नीमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीये. नवविवाहित जोडप्यांमध्ये देखील सोशल मीडियामुळे वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. Pune News : True caller वर संशय अन् जिगरबाज पुणे पोलिसांनी खतरनाक दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या   यावर्षी एक जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत 927 पती-पत्नीच्या तक्रारी महिला सहाय्यक कक्षाकडे आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 300 हून अधिक तक्रारी या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आल्याचे समोर आले आहे. व्हाट्सअप वर मित्र मैत्रिणीची चॅटिंग केल्याच्या संशयावरून अनेक प्रकरणे घटस्फोटापर्यंत देखील केली आहेत. तसेच इंस्टाग्राम वर व्हिडिओ का टाकतेस, डान्सचे रिल्स का अपलोड करते, फॉलोवर्स कसे काय वाढले अशा कारणांवरून पती-पत्नीचे वाद विकोपाला जात आहेत. पतीच्या हातातून मोबाईल सुटत नसल्याच्या तक्रारी देखील महिला सहाय्यक कक्षाकडे आल्या आहेत. रोसा कक्षातील महिला सहाय्यक कक्षात शहरातील विविध भागातील महिलांच्या कौटुंबिक वादासह विविध तक्रारी येतात त्याचे निराकरण ही केले जाते. मात्र आजघडीला सोशल मीडियाच्या अती वापरामुळे पती-पत्नीमध्ये घटस्फोटापर्यंत प्रकरणे जात आहेत. यामुळे काहींसाठी वरदान ठरलेला सोशल मीडिया मात्र पती-पत्नीसाठी घटस्फोटाचे कारण बनताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या