JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : पालकांच्या खिशाला लागणार कात्री, पुस्तकांच्या किंमती वाढल्या, पाहा दरवाढीचे कारण Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : पालकांच्या खिशाला लागणार कात्री, पुस्तकांच्या किंमती वाढल्या, पाहा दरवाढीचे कारण Video

शालेय पुस्तकांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. यामागे काय कारण आहे पाहा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 8 जून : नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमवर आता विद्यार्थी आणि पालकांनी पुस्तकांच्या खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र, वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनावरही पाहिला मिळत आहे. शालेय पुस्तकांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार यावर्षी वाढणार असल्याचं चित्र पाहिला मिळत आहे.   किती झाली वाढ? गेल्या दोन - तीन वर्षात कोरेानाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून अजूनही विद्यार्थी सावरलेला नाही. तोच आता पालकांच्या खिशालाही कोरोनानंतर 25 टक्के पुस्तकांच्या किंमती वाढल्याने कात्री लागणार आहे. यंदा कागदाच्या भाववाढीमुळे 20 ते 25 टक्के पुस्तक सेटच्या किंमतीतत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

गेल्यावर्षी 70 ते 80 रुपयाला मिळणारे पुस्तक आता 100 ते 115 रुपयांपर्यंत मिळत आहे. यापूर्वी जो पुस्तकांचा संच 450 ते 500 रुपयांना मिळायचा तो आता 700 ते 800 रुपयाला मिळत आहे. पुस्तकांबरोबरच वह्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. पूर्वी 10 रुपयाला येणारी वही आता 15 ते 20 रुपयाला मिळत आहे. कागदाच्या किंमती वाढल्या  जागतिक बाजारपेठांमध्ये कागदाच्या किंमती या एक ते दोन टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये कागदाच्या किंमती वाढल्यामुळे पुस्तकांच्या किंमतीमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ ही करण्यात आलेली आहे. बालभारतीचे पुस्तक आणि खाजगी पुस्तकांमध्ये देखील ही वाढ झालेली आहे, असं पुस्तक विक्रेते विशाल डोणगावकर यांनी सांगितले.

Jalna News : पालकांनो, पुस्तकांचा बदलला पॅटर्न, दप्तराचं ओझंही होणार कमी! SPECIAL REPORT

संबंधित बातम्या

पुस्तकांच्या किंमती कमी कराव्या सर्वत्र महागाईचा भडका उडतच आहे. यामध्ये भाजीपाला पेट्रोल यांच्या किंमती या वाढत होत्या अशातच पुस्तकांच्या किंमती वाढल्यामुळे आम्हा पालकांना मोठा त्रास होत आहे. ज्या पालकांना दोन ते तीन आपत्य आहेत अशा पालकांनी काय करावे. पुस्तकांच्या किंमती कमी कराव्या अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असं पालक जयश्री शिर्के यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या