जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : पालकांनो, पुस्तकांचा बदलला पॅटर्न, दप्तराचं ओझंही होणार कमी! SPECIAL REPORT

Jalna News : पालकांनो, पुस्तकांचा बदलला पॅटर्न, दप्तराचं ओझंही होणार कमी! SPECIAL REPORT

Jalna News : पालकांनो, पुस्तकांचा बदलला पॅटर्न, दप्तराचं ओझंही होणार कमी! SPECIAL REPORT

शाळेतील मुलाच्या पाठीवरील दप्तराच ओझं आता कमी होणार आहे. कसं असेल नवीन पुस्तक पाहा

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 8 जून : उन्हाळी सुट्ट्या संपून लवकरच शाळांचे दरवाजे उघडतील. शाळेच्या पहिल्याच दिवशी कोऱ्या करकरीत पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना मिळेल. मात्र यावर्षी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. शाळेतील मुलाच्या पाठीवरील दप्तराच ओझं आता कमी होणार आहे. कारण नवीन पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांना धडा संपल्यानंतर गृहपाठ करण्यासाठी वहीच्या पानांची व्यवस्था आता पुस्तकातच करण्यात आली आहे. कशी आहेत नवी पुस्तके? लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा अनुषंगाने बालभारतीने पुस्तकांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता आलेल्या नवीन पुस्तकांनुसार लहान मुलांना पाठीवर जास्तीचे ओझे वहावे लागणार नाही. बालभारती विभाग यांच्या वतीने मागील वर्षीपेक्षा यावर्षी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे पुस्तकांमध्ये बराचसा बदल केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमध्ये एक ते चार विषयाचे भाग करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे पुस्तक सोबत नेण्याची आवश्यकता नाहीये. या एका पुस्तकामध्ये भाग क्रमांक एक मध्ये चार विषय असे दिलेले असून नवीन बदल करण्यात आला आहे.

Jalna News : जालनाची मुलं हुशार… एकाच संस्थेतील 9 विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठाची 5 कोटींची फेलोशिप, Video

एक निरंक पान प्रत्येक भाग संपल्यावर त्यामागे एक निरंक पान सोडण्यात आले आहे. बालभारती विभागाच्या वतीने 75 टक्के पुस्तके जालना जिल्ह्यासाठी प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरु झाले आहे अशी माहिती जालना गट समन्वयक पि.आर. जाधव यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात