शाळेतील शिपायाच्या हत्येनं बीड हादरलं
सुरेश जाधव, बीड 21 जुलै : देशासोबतच राज्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हत्येची अशीच एक घटना आता बीडमधून समोर आली आहे. या घटनेत शाळेतील शिपायाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना बीडच्या माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. अनिल सर्जेराव शेंडगे (वय 27 वर्षे) असं मयत तरुणाचं नाव आहे. या तरुणाला फोन करून बायपास रोड येथे बोलवण्यात आलं. फोनवरून बोलावून घेत तरुणाच्या डोक्यात दगड घालत त्याचा खून केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Hingoli News : गर्लफ्रेंडवर जीव लावला, तिच्या घरच्यांनीच तरुणाला विष पाजून संपवलं, हिंगोलीतील घटना धारूर तालुक्यातील चिखली येथील मुळ रहिवासी असलेले अनिल सर्जेराव शेंडगे (वय 27 वर्ष) हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर कार्यरत होते. माजलगाव येथील मंजरथ रोड शिक्षक कॉलनी येथे ते राहत होते. गुरुवारी त्यांना मोबाईलवर कॉल करून बायपास रोड येथे बोलावून घेतलं गेलं. इथे पोहोचताच त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना रात्री साडेआठ ते 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीत गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी तरुणाला संपवलं - हिंगोलीमधूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात एकमेकांवर जीवापाड प्रेम पण अखेर तरुणीच्या घरच्यांनी तरुणाचा खेळ खल्लास केला. त्याची सगळी स्वप्न धुळीला मिळवली आणि भयंकर घडलं. प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी मुलाची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळण्यासाठी न्यायालयाची पायरी चढली आणि त्यानंतर सगळी चक्र फिरली. न्यायालयाने आदेश काढला आणि त्यानंतर तरुणीच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.