JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संभाजीनगरमधील श्वानांमध्ये बळावतोय गंभीर आजार, जीवघेणा धोका टाळण्यासाठी 'ही घ्या काळजी, Video

संभाजीनगरमधील श्वानांमध्ये बळावतोय गंभीर आजार, जीवघेणा धोका टाळण्यासाठी 'ही घ्या काळजी, Video

Chhatrapati Sambhaji Nagar : श्वानांमध्ये हा रोग बळावत असून मृत्यू होत आहे. श्वानांची काय काळजी घ्यावी जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये श्वान मृत्यूच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. मात्र, या श्वानांचा मृत्यू का होत आहे असा प्रश्न सर्वसामान्यांकडून केला जात होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून श्वानांमध्ये लुळा हा रोग आला असून या रोगामुळे मृत्यू होत आहे. यामुळे श्वान प्रेमींनी श्वानांचं लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन  छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पवार यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये श्वानांचे पाय लुळे पडणे आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच या श्वानांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. अचानक श्वानांचा मृत्यू होत असल्यामुळे प्राणी प्रेमींकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात होती तर सर्वसामान्यांमध्ये या मृत्यूबाबत तर्कवितर्क तर काही ठिकाणी  अफवाही पसरत होत्या. मात्र, आता श्वानांच्या मृत्यूचे कारण आता समोर आले असून 15 वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला हा लुळा रोग आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरताना दिसून येत आहे.

हे आहेत लक्षण श्वानाला जर लुळा रोग झाला असल्यास श्वानाचे पाय आणि डोळे पडतात. त्यामुळे श्वान एकाच ठिकाणी बसून राहतो. श्वान तापाने पण यामुळे तो जोरात ओरडतो. या आजारामुळे मेंदूत त्रास होत असल्यामुळे तो लकवा मारतो. तसेच नाकातून पाणी येत असते. श्वानांना बाजूला ठेवा लुळा रोग (कॅनाइन डिस्टेंपर) हा संसर्गजन्य रोग श्वानांमध्ये आढळून येतो. एखाद्या श्वानाला हा रोग झाल्यास त्याच्या लाळेतून, विष्ठेतून किंवा मूत्र यातून हा रोग झपाट्याने पसरतो. यामुळे असे श्वान आढळून आले तर इतर श्वानांना बाजूला ठेवा. तात्काळ लसीकरण करून घ्या. जेणेकरून इतर श्वानांना या आजाराचा त्रास होणार नाही. तसेच यामुळे हा आजार पसरण्यापासून रोखता येऊ शकतो, असं महेश पवार यांनी सांगितले.

Beed News: नोकरी सोडून सुरू केलं श्वान पालन, लाखोंच्या उलाढालीतून कमावतोय मोठा नफा, Video

संबंधित बातम्या

लस उपलब्ध करून द्यावी जिल्ह्यामध्ये श्वानांमध्ये आढळून येणारा या आजारावरती पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नसल्यामुळे श्वानप्रेमींची अडचण होत आहे. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना ही लस खाजगी दवाखान्यांमधून खरेदी करावी लागते. यामुळे लवकरात लवकर पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्वान प्रेमी बेरल सांचीस यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या