JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Farmer News : शेतकरी पती-पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन; 24 तासातील दुसरी घटना

Farmer News : शेतकरी पती-पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन; 24 तासातील दुसरी घटना

Farmer News : पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील शेतकरी पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

सांकेतिक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 28 जुलै : गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात व्हनगुत्ती येथील पती-पत्नीने दोन व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक झाल्यावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काय आहे प्रकरण? सदर घटनेची मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील दर्गा परिसरात तरुण पतीपत्निने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. राजू दामोधर खंडागळे (वय वर्ष अंदाजे 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय वर्ष 22 ते 23) अशी दोघांची नावे समजतात. मिळालेली माहिती अशी की 28 जुलै शुक्रवार रोजी दोघे पती पत्नी सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला. वाचा - मुलीचा बाप कोण? सासऱ्याची DNA चाचणी केली आणि अख्खं गाव हादरलं साधारण 6 ते 6:30 वाजेदरम्यांन दर्गा ते शेंदूर वादा रोडवरील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बिडकीन ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनेची पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सदरील घटनेच्या पुढील तपास बिडकीन पोलीस हे करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या