JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आला पावसाळा, पोटाला सांभाळा, कशी घ्या काळजी? नाहीतर... Video

आला पावसाळा, पोटाला सांभाळा, कशी घ्या काळजी? नाहीतर... Video

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै : सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, पोटाचे विकार या सारख्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल  छत्रपती संभाजीनगरमधील  शल्य चिकित्सक डॉ. मनीषा भट्टाचार्य यांनी माहिती दिली आहे. पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळं घाणीचे साम्राज्य निर्माण होतं. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंगू, चिकनगुनिया, मलेरियाने ग्रस्त झालेले रुग्ण दिसून येतात. यासोबतच दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला, पोटाचे विकार यासारखे आजार जडतात. त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.

काय काळजी घ्यावी? नागरिकांनी सर्वप्रथम पाणी हे उकळून प्यावे. यामुळे पाण्यामध्ये काही जंतू वगैरे असतील ते मरून जातील आणि आपल्याला शुद्ध पाणी हे पिण्यासाठी मिळेल. शाळा कॉलेजमध्ये जाताना मुलांनी अंगाला ओडोमास लावून किंवा फुल बाह्यांचे कपडे घालूनच जावे. नागरिकांनी सुद्धा घराच्या बाहेर जाताना याची काळजी घ्यावी. डास चावू नये म्हणून घरामध्ये मच्छरदाणीचा वापर करावा. जेणेकरून कमीत कमी डास हे तुम्हाला चावतील.

Diet Tips: वजन कमी होत नाही म्हणून टेन्शन आलंय? आहारातील ‘या’ गोष्टींमध्ये करा लगेच बदल, Video

संबंधित बातम्या

सर्वात महत्त्वाचे म्हणजे उघड्यावरचे पदार्थ खाताना ज्या ठिकाणी जास्त माशा असतील अशा ठिकाणी खाणे टाळावे. आपण घरामध्ये जे पाणी भरून ठेवतो ते वारंवार चेक करत रहा. त्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या होतात. त्यामुळे त्यामध्ये तुरटी फिरवावी किंवा आबेट लिक्विडचे ड्रॉप टाकावेत. या सर्व गोष्टी करून आपण पावसाळ्यामध्ये आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो, असं डॉ. मनीषा भट्टाचार्य सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या