पुणे, 10 जुलै : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या देखील बदलत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात आढळणाऱ्या समस्या देखील वेगळ्या आहेत. शहरामध्ये राहणाऱ्या अनेकांना वजन वाढण्याची समस्या भेडसवाते. वाढलेलं वजन कसं कमी करावं? हा त्यांच्यापुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. याबाबत पुण्यातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शर्वरी इनामदार यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कसं कमी करावं वजन? डॉ. इनामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’ आपण जे नेहमी अन्न खातो, ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं होतं काय? हे कळणं आपल्यासाठी अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ घोडा गवत खातो, तो कुठलाही त्याचा पदार्थ तयार करत नाही. परंतु माणसांमध्ये बघायला गेलं तर माणूस हे पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ आपण भाताची खिचडी खाल्ली तर ती चवीला तिखट असते आणि भाताची खीर खाल्ली तर ती गोड असते. हे खाल्ल्यानंतर आपल्याला रक्तात साखर सापडते. या साखरेला शास्त्रीय भाषेत अनेक नावं आहेत. साखर फळांमधून आली की त्याला fructose म्हणतात, उसामधून आली की तिला सुक्रोज म्हणतात, दुधातून आली की लॅक्टोज म्हणतात अशी अनेक त्याला नावं आहेत.
तुम्ही वनस्पती पासून बनणारे पदार्थ खाल्ले की दोन तासाने रक्तात सापडते ती साखर असते. तसं प्राण्यापासून येणारे पदार्थ जे आहेत ते काही अमायनो ऍसिडे, फॅटी ऍसिड म्हणून जातात. 100 पैकी 75 लोकांमध्ये जी साखर असते त्याचा मेटाबोलिझम तितका स्ट्रॉंग नसतो. शरीराचे प्रत्येक सेल अमायनो ऍसिड, fatty ऍसिड पासून बनते. मग शरीरात जी साखर जाते त्याचं होतं काय? तर हे जे काही मूठभर लोक आहेत. ती एनर्जीसाठी ती खूप चांगली वापरतात मग ज्यांच्या एनर्जीसाठी ही साखर वापरली जात नाही. ही साखर फॅट स्टोअर मध्ये डम्प होते. हा प्रकार नेहमी सुरू असतो. रोजचा भाजी पोळी वरण-भात हा आहार खाऊन सुद्धा बाहेरचं पाकीट खायला नको हे माहिती असून सुद्धा जाडी वाढणं सुरू होतं. Weight Loss Tips : वजन कमी करायचं असेल तर चुकूनही खाऊ नका हे फूड कॉम्बिनेशन्स शरीरातले हार्मोन्स, पेशी, शरीर हे सक्षम होण्यासाठीच जे अन्न आहे…ते आपल्याला खायला पाहिजे. त्यावेळी कॅलरी काउंटिंग करू का? कुठले शेक पिऊ? मग रोज मॅरेथॉन पाळायला जाऊ का? असे सगळे शंभर प्रश्न उत्पन्न होतात. ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये अडकताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मॅरेथॉन पळणारा माणसाला सुद्धा पोट असते. नुसताच एकतर्फी व्यायाम किंवा कुठली तरी दुसरी गोष्ट ऐकून केलेला अर्धवट डायट किंवा कॅलरी काउंटिंगच्या नावाखाली केलेला उपास या चक्रात अडकू नये. आपली थोडीशी फॅमिली हिस्टरी, आपल्याला कुठलं अन्न पचतंय हे एकदा आपण जर बघितलं तर आपल्याला डायट आणि व्यायाम मॅनेज करणे सोपं जातं, असं डॉ. इनामदार यांनी सांगितलं. काय असतो गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल? आजार होण्यामागे मूळ कारणे काय? आपण खातोय ते अन्न फॅट स्टोअरमध्ये जाऊन डम्प होणार आहे? का त्याच्यापासून आपली हाड आणि मसल्स मजबूत होणार आहे? हे एकदा आपण समजलं की कुठल्या दोन गोष्टी एकत्र करायच्या आणि कुठल्या करायचा नाहीत. कुठल्या खायचा आणि कुठल्या वगळायचा हे समजतं, असं इनामदार यांनी स्पष्ट केलं. आरोग्याचं आणि वजनाच गणित समजणं एकदम सोपं आहे. त्याचबरबोर वजन कमी करणं, पोटाचा घेर नियंत्रणात ठेवणं आणि त्याच्याबरोबरच आपले शारीरिक आणि मानसिक शक्ती टिकवणे आणि वाढवणे या गोष्टीही सोप्या आहेत. त्यासाठी खाण्याविषयीचे गैरसमज दूर व्हायला हवेत, असा सल्लाही इनामदार यांनी दिला.
(सूचना : येथे दिलेली माहिती तज्ज्ञांचं वैयक्तिक मत आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)