JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पत्नी माहेरी गेली म्हणून मुलांना दिली भयानक शिक्षा; निर्दयी बापाच्या कृत्यानं छ. संभाजीनगरमध्ये खळबळ

पत्नी माहेरी गेली म्हणून मुलांना दिली भयानक शिक्षा; निर्दयी बापाच्या कृत्यानं छ. संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

बापानेच चिमुकल्याला विहिरीत फेकले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 29 एप्रिल, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी बापाने आपल्याच दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकल्यानं खळबळ उडाली. यातील एका मुलाला वाचवण्यात यश आलं आहे, तर दुसऱ्याचा मृत्यू झाला आहे. राजू प्रकाश भोसले असं आरोपीचं नाव आहे, पत्नी माहेरी गेली असून ती परत येत नसल्यानं रागाच्या भरात आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. पत्नी माहेरी गेल्याचा राग  समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी राजू प्रकाश भोसले याचा दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी माहेरी गेली होती. पत्नी पुन्हा घरी येत नसल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं. शहरातील चिखलठाणा येतील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने आपल्या दोन्ही मुलाला पाण्याने भरलेल्या विहिरीत फेकून दिले.

प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्यांना उचलून फेकलं, आता दोन्ही शिक्षिकांना जेलमध्ये टाकलं

संबंधित बातम्या

  एकाचा मृत्यू  

या घटनेत श्रेयस राजू भोसले वय सात वर्ष याचा मृत्यू झाला आहे. तर  शंभू उर्फ शिवम राजू भोसले वय नऊ वर्ष याला वाचवण्यात यश आलं. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या