सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च : आपण एखादी वस्तू काम झाल्यावर टाकून देतो. याच टाकाऊ वस्तूपासून एखाद्या व्यक्तीनं आपलं स्वप्न पूर्ण केलं, असं तुम्हाला साांगितलं तर…त्याचं आश्चर्य नक्कीच वाटेल. छत्रपती संभाजीनगरमधील इंजिनिअर महिलेनं हे प्रत्यक्षात केलंय. या महिलेनं या वस्तूंपासून नवनिर्मिती करण्यासाठी स्वत:ची नोकरी सोडली आणि स्टार्टअप सुरू केलंय. कसा झाला प्रवास? प्राची जोशी-पटवर्धन असं या महिलेचं नाव आहे. त्या मुळच्या जालना जिल्ह्यातील आहेत. संभाजीनगरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या प्राची यांना लहानपाणापासून टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या वस्तू करण्याचा छंद होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काळ शिक्षिकेची नोकरी केली. तसंच महापालिकेतही कार्यरत होत्या. महापालिकेची नोकरी सुरू असताना त्यांच्या घरातील फर्निचरचं काम सुरू होतं. हे काम पूर्ण झाल्यानंतर घ चकचकीत झालं. पण, कामारांनी हे काम करत असताना उरलेलं साहित्य फेकून दिलं. प्राची यांना ही गोष्ट खटकली. त्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच 2020 साली इनोरा या स्टार्टअपचा जन्म झाला. 2 वेळेस PSI पद हुकलं, नाश्ता सेंटरमधून करतो लाखोंची कमाई, Video इनोरी नाव का? या स्टार्टअपला इनोरी हे नाव देण्यामागंही प्राची यांचा खास उद्देश आहे. इनोरी म्हणजे इनोव्हेटीव नारी. महिलामधील सृजनशक्तीचाच त्यांनी एकप्रकारे गौरव केला आहे. त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2 महिलांना रोजगार दिला आहे. कचरा मुक्तीच्या दिशेनं पाऊल प्राची यांच्या स्टार्टअपमध्ये वापरले जाणारे हे साहित्य हे संपूर्णपणे कचऱ्यातून आले आहे. दुकानात शिल्लक राहिलेलं फर्निचर, पत्रिका, स्पंच शीट, लहान प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यांची झाकण, फोडलेले नारळ, जुन्या तारा, केबल, दगड या टाकाऊ वस्तूंपासून त्या सुंदर साहित्य तयार करतात.
प्राची यांनी होल्डरपासून सुरूवात केली. मागणी वाढल्यानंतर उत्पादनही वाढवलं. त्यांच्याकडं सध्या पेन स्टॅन्ड, फोटो होल्डर,की किचन, मॅग्नेट, कार हँगिंग, पेपर वेट, वॉल क्लॉक, बॉक्स फ्रेम्स,वॉल हँगीग, पेपर वेट, वॉल क्लॉक, बॉक्स फ्रेम्स,वॉल हँगिंग यांच्यासह ग्राहकांच्या मागणीनुसार हवे तो प्रॉडक्ट तयार करुन देतात. त्यांनी इनोरी क्राफ्ट नावाची स्वत:ची वेबसाईट देखील सुरू केलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या महाराष्ट्रातील शहरांसह बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता या देशातील महानगरांमधीलही ऑर्डर घेतात. ’ मी टाकाऊ वस्तूंपासून सुंदर टिकाऊ वस्तू तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या वस्तूंना बाजारात चांगली मागणी मिळत आहे. आम्ही ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वस्तू तयार करतो. भविष्यामध्ये इनोरी या स्टार्टअपचं एका ब्रँडमध्ये रुपांतर करण्याचा निर्धार प्राची यांनी यावेळी बोलून दाखवला.