अपूर्वा तळणीकर छत्रपती संभाजीनगर, 17 मे : छत्रपती संभाजीनगर ला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक जागतिक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तू बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. पण या ऐतिहासिक वास्तू सोबतच शहरात असं एक ठिकाण आहे या ठिकाणी चक्क चोर बाजार भरवला जातो. खर तर याचं नाव रविवारचा आठवडी बाजार आहे. पण त्याला चोर बाजार हे नाव कसं पडलं आणि इथं कोणकोणत्या वस्तू मिळतात याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. छत्रपती संभाजीनगर येथे मोंढा परिसरामध्ये दर रविवारी हा आठवडी बाजार भरतो. काही लोक या बाजाराला चोर बाजार असे म्हणतात. हा बाजार गेल्या 70 वर्षांपासून भरतो. या बाजारात काही नवीन वस्तू तर काही जुन्या वस्तू अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू इथे तुम्हाला मिळतात. चोर बाजारामध्ये तुम्हाला सुई पासून ते सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू या भेटतात.
चोर बाजार का म्हणतात? हा चोर बाजार नाही आहे. याचं खरं नाव रविवारचा बाजार असं आहे. आम्ही कोणत्याही चोरीच्या वस्तू विकत नाहीत. इथं जो माल येतो तो मुंबईच्या चोर बाजार मधून येतो. यामध्ये काही नवीन आणि काही जुना माल असतो. म्हणून याला लोक चोर बाजार असे म्हणतात, असं येथील विक्रेत्यांनी सांगितले. कोणत्या वस्तू मिळतात? कपडे, चप्पल, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, सायकल, मोबाईल, टीव्ही, फ्रिज, शेतीसाठी लागणारे सामान, वह्या पुस्तके,पेन, ट्राय पॉड, प्रिंटर , मिक्सर आणि सर्व इलेक्ट्रिक वस्तू भेटतात.
Chhatrapati Sambhaji Nagar News : कपड्यांची हौस होईल पूर्ण, ‘इथं’ करा स्वस्तात खरेदी Video
काय आहेत किंमती? इथं तुम्हाला 1 लाख रुपयांचा टीव्ही फक्त 12 हजार रुपयांत मिळतो. तसेच सर्व वस्तू या त्याच्या मूळ किंमतीच्या अर्ध्या किंमतीत भेटतात, असंही येथील विक्रेत्यांनी सांगितले.