जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : कपड्यांची हौस होईल पूर्ण, 'इथं' करा स्वस्तात खरेदी Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : कपड्यांची हौस होईल पूर्ण, 'इथं' करा स्वस्तात खरेदी Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : कपड्यांची हौस होईल पूर्ण, 'इथं' करा स्वस्तात खरेदी Video

याठिकाणी तुमची कपड्यांची हौस होईल पूर्ण होईल. वेगवेगळ्या प्रकारचे सर्वात स्वस्त कपडे तुम्हाला खरेदी करता येतील.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा प्रदिप तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 6 मे : कपडे म्हटलं तर मुलींच्या जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय असतो. मुलींकडे कितीही कपडे असले तरी त्यांना कपड्यांची कमतरता असते. त्यामुळे मुली सर्वाधिक कपडे खरेदी करण्यावर प्राधान्य देतात. यामुळे सर्वात स्वस्त कपडे कुठे मिळतील यासाठी महिला आणि मुली शोध घेत असतात. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त कपडे कुठे खरेदी करता येतील याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कुठे कराल खरेदी? छत्रपती संभाजीनगर शहर मराठवाड्यासाठी महत्त्वाचे मार्केट म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत तसेच महत्त्वाची बाजारपेठ आहे शहरातील गुलमंडी भागामध्ये या ठिकाणी मुलींचे सर्वात स्वस्त कपडे मिळतात. याठिकाणी 50 रुपयांपासून तुम्ही कपड्यांची खरेदी करू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

कोणत्या प्रकारचे मिळतात कपडे? या ठिकाणी मुलींना टॉप, कुर्ती, ड्रेस मटेरियल, आणारकली, कुर्ती, पैठणी ड्रेस, बांधणी ड्रेस, वन पीस, पार्टी वियर, लेगिंस, जीन्स, शर्ट, लखनवी, थ्री पीस ड्रेस, लाँग ड्रेस, लेहेगा चोली, नाईट ड्रेस, पंजाबी ड्रेस, खन कुर्ती असे विविध प्रकारचे कपडे इथं स्वस्तात उपलब्ध आहेत. अश्या आहेत कपड्यांच्या किंमती कुर्ती 100 ते 1000 रुपये टॉप 50 ते 500 रुपये लेगिंस 100 ते 250 रुपये ड्रेस मटेरियल 200  ते 1000 रुपये पंजाबी ड्रेस 100 ते 1000 रुपये

Wholesale Market : सर्वात स्वस्त कपडे मिळणारे संभाजीनगरचे मार्केट, लहान उद्योगासाठी आहे हक्काची जागा, Video

ट्रेंडच्या कपड्यांची करा खरेदी आमच्याकडे सर्वात स्वस्त महिलांचे कपडे उपलब्ध आहेत. यामध्ये 50 रुपयांपासून मुलींचे टॉप उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामध्ये नवीन वेगवेगळ्या व्हरायटीचे टॉप उपलब्ध आहेत. प्रत्येक पंधरा दिवसानंतर नवीन स्टॉक येत असतो. त्यामुळे चांगले आणि नव्या ट्रेंडची कपडे मुलींना या ठिकाणी खरेदी करता येऊ शकतात, असं गुलमंडी बाजारपेठेतील व्यापारी मजर खान यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात