JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रातील या शहरात आहेत सर्वाधिक वाघ, SPECIAL REPORT

तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रातील या शहरात आहेत सर्वाधिक वाघ, SPECIAL REPORT

महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरानं वाघांच्या संवर्धनाचा नवा पॅटर्न तयार केलाय. त्यामुळे येथील वाघांची संख्या वाढलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 29, जुलै : वेग, धाडस आणि पराक्रमाचं प्रतिक असलेल्या वाघाचं सर्वांनाच आकर्षण असते. कोणत्याही प्राणी संग्रहालयात किंवा जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना वाघ पहिल्यांदा पाहयचा असतो. देशातील वाघांची संख्या त्यांचे संवर्धन याबाबत नेहमी वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होतात. छत्रपती संभाजीनगरनं वाघांच्या संवर्धनाचा नवा पॅटर्न तयार केलाय. संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयातून देशभरात वाघ पाठवले जातात. त्यामुळे वाघांचं माहेरघर अशी ओळख याची निर्माण झालीय. माघेरघर का? छत्रपती संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ उद्यानातल्या वाघांचा लौकिक आता देशभर पसरलाय. सिद्धार्थ उद्यानात 10 वाघ असून यामध्ये 7 पिवळ्या पट्ट्याचे तर 3 पांढऱ्या पट्ट्याचे वाघ आहेत. या उद्यानात सर्वप्रथम पंजाबमधून वाघांची जोडी आणली होती. त्यानंतर सध्या पाचव्या पिढीचं वास्तव्य आहे. आत्तार्यंत या उद्यानातून 24 वाघ इतर प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आलेत.

वाघांना का आवडते संभाजीनगर? ‘संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ उद्यानात वाघांना पोषक वातावरण आहे. वाघांच्या प्रजनानानासाठी जीनो टाईप महत्त्वाची असते. इथं आणलेल्या पहिल्या जोडीचा जिनो टाईप चांगला होता. त्यामुळे इथं वाघांची संख्या वाढली आहे. या उद्यानात वाघांच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यांना वेळेवर जेवण मिळतं. बबली वाघीण आणि तिच्या बछड्यांची धमाल मस्ती, ताडोबातील वाघांचा पाहा Video आमच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांनी इतर प्राणी संग्रहालयात जाऊन वाघांची काळजी कशी घ्यावी याचं ट्रेनिंग घेतलंय,’ अशी माहिती  महानगर पालिकेचे निवृत्त डॉ.बी.एस. नाईकवाडे यांनी दिलीय. या उद्यानात वाघांची वाढलेली संख्या ही संभाजीनगरसाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या