JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : सर जाऊ नका, शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर VIDEO

Chhatrapati Sambhaji Nagar News : सर जाऊ नका, शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकाची 12 वर्षांनं बदली झाली. यावेळी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अपूर्व तळणीकर छत्रपती संभाजीनगर, 24 जून : लहान मुलांच्या आयुष्यामध्ये पहिले गुरू आई वडील आणि त्यानंतरचे गुरु हे शाळेतील शिक्षक असतात. या दोन्ही गुरूंच्या माध्यमातून लहान चिमुकल्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम केलं जातं. यामुळे शिक्षकांना मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक वर्षांपासून महत्त्व आहे. याचे महत्त्व ओळखून अनेक शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवतात आणि याचीच पावती म्हणून अनेक वेळा शिक्षकांना निवृत्तीच्या वेळेस किंवा त्यांच्या नोकरीच्या बदलीच्या वेळेस विद्यार्थी पालकांच्या प्रेमाची पावती मिळते. याची प्रचिती  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी या गावात पाहिला मिळाली. विद्यार्थी आणि पालक भावनिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या तारु पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. या शाळेत 12 वर्षापूर्वी सतिश बाबुराव सावंत यांची बदली झाली अन् ते शाळेत रुजू झाले. सावंत यांनी पैठण तालुक्यात तारु पिंपळवाडी शैक्षणिक वर्ष 2010 पासुन ते सलग 12 वर्षं नोकरी केली. या काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा सुधारला त्यासोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या यामुळे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातही आपलं वर्चस्व दाखवू शकले. मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या या शिक्षकाची 12 वर्ष सेवा झाल्यानंतर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये बदली करण्यात आली.

शिक्षकाची बदली झाल्याचं कळताच लहान विद्यार्थी पालकांसोबत गावकऱ्यांना ही बातमी पटली नाही त्यांनी खात्री करण्यासाठी शाळेला विचारण्यात मात्र ही बातमी खरी ठरली. शिक्षकाची बदली झाल्याचं कळतच विद्यार्थी आणि पालक भावनिक झाले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. यामध्ये फक्त विद्यार्थी आणि पालकच नव्हते तर अनेक ज्येष्ठ नागरिक ही भावनिक झाल्याचे बघायला मिळालं. वैजापूर येथे बदली झाल्याने सतिश सावंत यांना निरोप देताना अक्षरक्ष सर्व गावांमध्ये शोककळा पसरली सर्वांचे डोळे पाणावले.

Kolhapur News : काम करत शिक्षण घ्यायचं आहे? मग इथं घ्या ॲडमिशन, पाहा Video

संबंधित बातम्या

ढोलताशांच्या गजरात मिरवणूक  आपल्या शिक्षकाला निरोप देताना शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांना ही अश्रु अनावर झाले. शाळेच्या प्रगतीचा आलेख आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थीत शिकवण हेच यामागचे कारण असावे. सतिश सावंत यांनी खोखो आणि बुद्धीबळ या स्पर्धेत विभागीय ठिकाणी विद्यार्थ्यांना नेले. सुरूवातीला आनंदअश्रु आणि गावभर ढोलताशांच्या गजरात मिरवणूक अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा निरोप समारंभ संपन्न झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या