JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ice Cream : उन्हाळ्यात आईस्क्रीमच्या किंमतीचेही बसणार चटके! पाहा Video

Ice Cream : उन्हाळ्यात आईस्क्रीमच्या किंमतीचेही बसणार चटके! पाहा Video

Ice Cream : वाढत्या उन्हाळ्यात आईस्क्रीमच्या किंमतीचे चटकेही ग्राहकांना सहन करावे लागणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च : उन्हाळा आला की सर्वांना आईस्क्रीम खाण्याचे वेध लागतात. या कालावधीमधील कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात आईस्क्रीम असतेच. आईस्क्रीम नसेल तर उन्हाळ्यातील कार्यक्रम पूर्ण होत नाहीत, असा अनेकांचा समज आहे. पण, वाढत्या महागाईमुळे छत्रपती संभाजी नगरमधील आईस्क्रीच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना उन्हासोबतच आईस्क्रीमच्या किंमतीचेही चटके सहन करावे लागणार आहेत. का वाढली किंमत? छत्रपती संभाजी नगर शहरात उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आईस्क्रीम उद्योगात लाखांची उलाढाल होते. थंड पदार्थांच्या विक्रीची शहरामध्ये अनेक दुकानं आहेत. यावर्षी आईस्क्रीम आणि ज्यूस सेंटरला महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. आईस्क्रीमसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. तसंच त्यासोबतच दूधही महाग झाल्यानं ही भाववाढ झाली आहे. घरगुती पद्धतीचं बीडचं फेमस आईस्क्रीम! बाराही महिने असते ग्राहकांची गर्दी, Video आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध, कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर यांचा सर्वात जास्त उपयोग होतो. या पदार्थांच्या किंमती दहा ते पंधरा टक्के वाढल्या आहेत. त्याचा परिणाम आईस्क्रीमच्या किंमतीवर झालाय. यापूर्वी 115 ते 135 रुपयांना मिळणारे फॅमिली पॅक आईस्क्रीमची किंमत आता  175 ते 200 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत आहे प्रत्येक वस्तूच्या कच्च्या मालामध्ये वाढ होत असल्यामुळे याचा परिणाम तयार होणाऱ्या वस्तूंवर होतो याचा असाच परिणाम आईस्क्रीमवर देखील झाला आहे दूध प्लास्टर पावडर सारखे सर्वात जास्त लागणारे पदार्थ यांचे किमती वाढल्यामुळे आईस्क्रीमच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत,’ असं आईस्क्रीमचे होलसेल मटेरियल विक्रेते संदेश डोशी यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या