JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar : 65 वर्षांच्या शेतकऱ्याची कमाल, शेतात केला नवा प्रयोग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पन्न

Chhatrapati Sambhaji Nagar : 65 वर्षांच्या शेतकऱ्याची कमाल, शेतात केला नवा प्रयोग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पन्न

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 65 वर्षांच्या शेतकऱ्यानं शेतात नवीन प्रयोग करून यशस्वी करून दाखवला आहे. यामध्ये त्याने कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 28 जून : शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतानाही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 65 वर्षांच्या शेतकऱ्यानं केला आहे. पारंपारिक पिकांना फाटा देऊन आपल्या एक एकर शेतीमध्ये शंभर जांभळाच्या झाडांची लागवड करुन ती जांभूळ शेती यशस्वी करून दाखवली आहे. त्याच्या जांभळाला सध्या बाजारपेठेत 180 ते 200 रुपये किलो भाव मिळत आहे. कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सानपवाडी या गावातील 65 वर्षांच्या शेतकऱ्याचे नाव जगन्नाथ गायकवाड आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या शेतात शंभर जांभळीच्या झाडांची लागवड केली होती. त्यानंतर मागील दोन वर्षापासून या जांभळीला जांभळ लागत असून या जांभळातून त्यांना दरवर्षी कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न होत आहे.

 पाण्याची कमी आवश्यकता विशेष म्हणजे जांभळीच्या शेतीला पाण्याची खूप कमी प्रमाणात आवश्यकता भासते. तसेच या जांभळी वरती कुठल्याही फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच जांभळीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून दुसरे पिक घेता येते आहे. लाखोंचे उत्पन्न  यंदा गायकवाड यांच्या एका एका जांभळीच्या झाडाला तब्बल एक क्विंटल पेक्षा अधिक जांभळे लागले आहेत. आज या जांभळाला 180 ते 200  रुपये प्रति किलो दर असल्याने त्यांना या जांभळीच्या माध्यमातून लाखों रुपयाचे उत्पन्न होणार असल्याचे जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : 120 भाकड गायींसाठी त्याने मोसंबीची बाग दिली सोडून, चाऱ्यासाठी हवी आणखी मदत

संबंधित बातम्या

दरम्यान, सुरुवातीलाच ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा फटका जांभळाच्या फळांवरती झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जांभळाची अचानक मागणी वाढली असून या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेमध्ये जांभळाचे दर हे 200 प्रति किलोच्या घरात गेले असल्याने जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या