अब्दुल सत्तारांची जीभ घसरली
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत दुसरं नेतृत्व तयार करण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना चांगलंच फटकारलं आहे. मात्र दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. त्यांनी संजय राऊत यांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे. नेमकं काय म्हटलं सत्तार यांनी? संजय राऊत यांच्यावर टीका करताना सत्तार यांची जीभ घसरली आहे. तो कुत्रा आहे, ‘आम्हीच त्यांना राज्यसभेवर पाठवलं. कुत्र्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. रोज सकाळी उठतो आणि भुंकतो. त्यांच्यापेक्षाही वाईट आम्हाला बोलता येतं. आमच्याच मतावर ते राज्यसभेत गेले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा, त्यांनी दिला तर मी पण राजीनामा देतो’ असं चॅलेंज अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. आता सजंय राऊत सत्तारांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुजबळांची टीका दरम्यान दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरेंबद्दल जे लिहीलं आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मग हा विषय संजय राऊत यांना पुन्हा उकरून काढण्याची काय गरज आहे? राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडावं का असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.