Manmohan Singh
**नंदुरबार, 25 ऑक्टोबर : ‘**सरकारी काम अन् बारा महिने थांब’ऐवजी आता ‘१२ वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण तब्बल बारा वर्षांनंतर नंदुरबारच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र (Scout Guide certificate) मिळाले आहे. ‘हे प्रमाणपत्र जर वेळीच मिळाले असते तर आयुष्याच्या करिअरसाठी ते महत्त्वाचे ठरू शकले असते. आता हे प्रमाणपत्र काय कामाचे’, असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एका प्रमाणपत्रासाठी तब्बल बारा वर्ष म्हणजे एक तप वाट पहावी लागली. 12 वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र अखरे मिळाले. ‘‘माझ्याविरुद्ध कोणतीही…’’,पत्र लिहून समीर वानखेडेंची पोलीस आयुक्तांना विनंती
स्काउटच्या पंतप्रधान ढालसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी स्काउट शिक्षक नरेंद्र गुरव यांनी स्वत:ची आणि 21 विद्यार्थ्यांच्या फायली पाठवल्या. 12 सप्टेंबर 2009 रोजी मुंबईत परीक्षण होऊन 6 ऑक्टोबर 2009 त्याच्या निकालाचे पत्र संबंधित शाळेला पाठविण्यात आले. त्यात स्काउटची पंतप्रधान ढाल स्पर्धेचे प्रमाणपत्र मिळाले असे जाहीर करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा तत्कालीन पंतप्रधान यांच्या उपस्थित 4 ते 8 जानेवारी रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार होता. काही कारणानी हा सोहळा रद्द झाला. त्या नंतर तब्बल बारा वर्षांनी 5 ऑक्टोबर 2021 रोजी ही प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. या प्रमाणपत्रावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सही असून ते प्रमाणपत्र 6 जानेवारी 2012 रोजी पाठविल्याची तारीख आहे . IND vs PAK मॅचदरम्यान अमित शहा पोहोचले भारत-पाक सीमेवरील बंकरमध्ये, पाहा VIDEO
हे प्रमाणपत्र अगोदर मुंबई येथे पाठविण्यात आले. त्यांनतर प्रकाशा येथील शाळेला पाठविण्यात आले. मुंबई येथून जे प्रमाणपत्र पाठविण्यात आले, त्यासोबत जे पत्र मिळाले आहे त्यावर 10 फेब्रुवारी 2021 अशी तारीख असून नंदुरबार ते मुंबई या प्रमाणपत्राच्या प्रवासाला 245 दिवसाचा कालावधी लागला आहे. त्यामुळे यंत्रणेमधील गतिमानता किती आहे हे लक्षात येते. या प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर काही जण सेवानिवृत्त झाले आहेत. यातील काही विद्यार्थी कामधंद्यालादेखील लागले आहेत.