• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • ''मला ड्रग्ज प्रकरणात...'', समीर वानखेडे यांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, केली विनंती

''मला ड्रग्ज प्रकरणात...'', समीर वानखेडे यांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, केली विनंती

समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 25 ऑक्टोबर: या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं (NCB) मुंबईत क्रूझवर (drug party on a cruise) ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला. या कारवाईनंतर एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांचं. या कारवाईनंतर त्यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) आरोप केलेत. तर रविवारी या प्रकरणात आणखी नवा ट्विस्ट आला. या प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या सुटकेसाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिलं आहे. मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. हेही वाचा-  'खासदाराला अर्ज भरता येऊ नये', गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला
     मला तुरुंगात टाकण्याच्या आणि सर्विसमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.
    समीर वानखेडे यांनी हे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं असून या पत्राची कॉपी पोलीस महासंचालक एसीबीला देण्यात आली आहे. 25 कोटी खंडणीच्या आरोपावर NCB चा खुलासा आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावर पुन्हा एकदा एनसीबीला (ncb) खुलासा करावा लागला आहे. समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी पंच प्रभाकर साईलचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. एनसीबीने एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावर खुलासा केला आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे. प्रभाकर साईलने काय केले आरोप प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. हेही वाचा-  ट्रकच्या धडकेनं टँकर पलटी, आगीचा उडाला भडका, 2 जणांचा मृत्यू
     क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे. आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: