JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याला निघालेली बस; समृद्धी महामार्गावरच काळाचा घाला, 25 लोक झोपेतच जळाले

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याला निघालेली बस; समृद्धी महामार्गावरच काळाचा घाला, 25 लोक झोपेतच जळाले

बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यातील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ प्रवशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं

जाहिरात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलढाणा 01 जुलै : बुलढाण्यात शनिवारी पहाटे एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. यात बसला आग लागून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना बुलढाणा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बसमधील आठ प्रवासी सुखरूप आहे. हा अपघात घडला तेव्हा ही प्रवासी बस नागपूरहून पुण्यात जात होती. शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यातील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ प्रवशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जे लोक सुरक्षित आहेत त्यांच्यात बस चालकाचाही समावेश आहे मोठी दुर्घटना! बुलढाण्यात प्रवासी बसला भीषण आग; 25 लोक जिवंत जळाले ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. स्थानिक रिपोर्टनुसार, ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्ता दुभाजकावर आदळली. यानंतर बसला आग लागली. पोलीस आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आधी नागपूर-औरंगाबाद रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली आणि नंतर दुभाजकाला धडकली. यानंतर बसला भीषण आग लागली. अपघात झाला त्यावेळी आतील प्रवासी झोपेत होते. त्यामुळे बाहेर पडण्याआधीच 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात तीन लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या