नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा : काळ आणि वेळ कधी कुठे आणि कसा येईल सांगता येत नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना भंडाऱ्यामधून समोर आली आहे. अंघोळीला गेलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मानेगाव सडक शिवारात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आर्वी इथे 8 ते 10 कुटुंबीय आपल्या मुलाबाळांसह काही दिवसांपूर्वी इथे राहायला आले. त्यांना तंबू ठोकून आपलं बस्तान बसवलं. सगळं काही सुरळीत होईल म्हणेपर्यंत काळानं घात केला आणि ही धक्कादायक घटना घडली.
कुटुंबातील व्यक्ती रोज अंघोळीसाठी तलावावर जायचे, त्यामुळे तिथली बऱ्यापैकी माहिती होती. लाखनी येथील आठवडी बाजार असल्याने तंबूतील काही लोक औषधी विक्रीसाठी गेले होते. बिरजूसिंग व क्रिष्णा हे युवक आपल्या तंबूवर होते.
केरळमध्ये ट्रेन जाळून आरोपी जखमी अवस्थेत पोहोचला रत्नागिरीत; महाराष्ट्र ATSने केली अटकघरात राहून कंटाळल्याने ते मासे पकडण्यासाठी गाव तलावात गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची माहिती मिळाली आहे. दोन तरुण बुडत असल्याचं तिथेच जवळ असलेल्या एक व्यक्तीच्या लक्षात आलं. त्याने गावकऱ्यांची मदत मागितली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली.
मध्यरात्री उठला, नवे कपडे घालून लावला टिळा; FB लाइव्ह करत तरुणाचं धक्कादायक पाऊलपोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले उपस्थित नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या दोन तरुणांना काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केल. घटनेची नोंद लाखनी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.