JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरे सरकारनं 25 कोटींची योजना गुंढाळली, भाजपनं सुरू केलं जलसमाधी आंदोलन

उद्धव ठाकरे सरकारनं 25 कोटींची योजना गुंढाळली, भाजपनं सुरू केलं जलसमाधी आंदोलन

सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं या योजनेला स्थगिती दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुसावळ, 23 डिसेंबर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव (Varangaon, Jalgaon) येथे बुधवारी भाजपतर्फे (BJP) 25 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी (Water Scheme) जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. योजनेचं काम त्वरित सुरू करावं, या मागणीसाठी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे (BJP Leader Sunil kale ) यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या जलसमाधी आंदोलनात वृद्ध महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हेही वाचा… राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वॉटरपार्क उघडण्यास परवानगी भाजप आंदोलकांनी पाण्यामध्ये उभे राहून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत मुख्याधिकारी पाणी पुरवठा योजनेचे वर्क ऑर्डर देत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर निघणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजप आंदोलकांनी घेतली आहे.  मुख्याधिकारी करीत असलेल्या दुटप्पी कामकाजाचा ही तीव्र शब्दात निषेध आंदोलकांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या

काय आहे प्रकरण? तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात 13 सप्टेंबर 2019 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी 25 कोटींची योजना मंजूर केली होती. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं या योजनेला स्थगिती दिली. 5 जून रोजी वरणगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात 7.77 दरानं जास्तीची निविदा आली. म्हणून शहर विकास विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी निविदांना मंजूर केल्यानं पाणी पुरवठा योजना थांबली आहे. हेही वाचा… महिलांना अश्लिल कॉल करणाऱ्या विकृताला अटक, बँकेत होता मोठ्या पदावर! पाणी पुरवठा योजना त्वरित मंजूर करावी, यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्त्वाखाली वरणगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दोन तासांपासून आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मुख्याधिकारी पाणी पुरवठा योजनेची वर्क ऑर्डर देत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर निघणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या