JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhaskar Jadhav Mohit Kamboj : ‘मोहित कंबोज हा फडतूस..’ भास्कर जाधवांचा भाजपवर जोरदार पलटवार; म्हणाले..

Bhaskar Jadhav Mohit Kamboj : ‘मोहित कंबोज हा फडतूस..’ भास्कर जाधवांचा भाजपवर जोरदार पलटवार; म्हणाले..

भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : मागच्या 8 महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडत 40 आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर अद्यापही फुटीवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांनी सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करत प्रतिक्रीया दिली. यावर पुढच्या काही तासांतच भास्कर जाघव यांनी मोहित कंबोज यांना थेट आव्हान दिलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, मोहित कंबोज हा फडतूस माणूस आहे. त्याने माझ्यावर केलेला एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. भाजपकडे भरमसाठ पैसा आहे. तपास यंत्रणा आहेत आणि सत्तेची मस्तीही आहे. मात्र, मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. तुमच्याकडे असलेल्या तपास यंत्रणा माझ्या मागे लावा, 100 सोडा, जर मी एकनाथ शिंदेंना पाच फोन जरी केले असतील, तर राजकीय जीवनातून मुक्त होईन, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

संसदभवनातील शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, शिंदे गटाकडून आणखी एक धक्का

संबंधित बातम्या

मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे, त्या अनाजीपंतांनाही मी सांगतो, तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संपवायला निघाला आहात. पण माझ्यासारखे 100 भास्कर जाधव उभे राहतील. माझ्यावर खोटे आरोप करून तुम्ही माझी कारकीर्द संपवू शकत नाही. कंबोजसारख्या फडतूस माणसाने आरोप केल्यानंतर माझी नाही, तर अनाजीपंतांची प्रतिमा डागाळली जात आहे, अशा खरमरीत शब्दात भास्कर जाधव यांनी भाजप आणि मोहित कंबोज यांच्यावर टीका केली.

जाहिरात

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले होते?

कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भास्कर जाधवांवर गंभीर आरोप केले होते. खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून 2022 मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान 100 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं.

जाहिरात

पण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार भास्कर जाधवांना आपल्या समवेत घेण्यास राजी नव्हते. कारण प्रत्येकाला वाटत होतं, की भास्कर जाधवांवर विश्वास ठेवू शकत नाही. आज भास्कर जाधव जेवढी बडबड करत आहेत. पण त्यावेळी ते तिकीट काढून गुवाहाटीला येण्यास निघाले होते.  

तुम्ही गद्दारी केली…’ बच्चू कडूंसमोर वृद्ध शेतकऱ्याने भर रस्त्यात घातला राडा, Live Video
जाहिरात

जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या बाहेर बसणार, असं भास्कर जाधव म्हणत होते. त्यांच्याबरोबर दुसरे नेते सुनील राऊतही होते, असा दावा कंबोज यांनी केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या