धाराशिव, 28 फेब्रुवारी : माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना कोर्टाने अडीच हजार दंड आणि एक दिवस कोर्ट संपेपर्यंत थांबण्याची शिक्षा काल(दि.27) दिली. यानंतर बच्चू कडू यांची शिक्षा संपल्यानंतर कोर्टातून बाहेर जात असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 80 वर्षीय शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंची गाडी अडवली.
यानंतर थेट त्या शेतकऱ्यांने बच्चू कडूंना बंडखोरी विषयी सवाल केला. आपण गुंडांसोबत गेलात आणि शेतकऱ्यांची गद्दारी केली. अशी भावना व्यक्त त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
हे ही वाचा : संसदभवनातील शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, शिंदे गटाकडून आणखी एक धक्का
यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्याला बाजूला घेतल्याने बाजू बच्चू कडू यांची गाडी बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान बच्चू कडू यांच्या बाबतीत हा दुसऱ्यांदा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मागच्या 8 महिन्यांपूर्वी बंडखोरी करत महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार केल्यानंतर बऱ्याच आमदारांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने अनोखी शिक्षा ठोठावली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने अनोखी शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांच्याकडून 2500 रुपयांचा दंड देखील वसुल केला आहे. आंदोलन प्रकरणात पोलिसांसह हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, या प्रकरणातील इतर तिघांना कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना कोर्ट सुटेपर्यंत कोर्टात बसून राहाणे आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2015 मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बच्चू कडु आणि इतर तीन जणांच्या विरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
हे ही वाचा : अजित पवार हातात कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर; कांदा, कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक
या प्रकरणी आज धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी या प्रकरणावर शिक्षा सुनावली. कलम 506 नुसार या प्रकरणात बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आले. कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसुन राहाणे तसेच अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. या प्रकरणातील इतर तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.