रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 4 मार्च: एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील एक दूर्लक्षित घटक म्हणून पाहिले जाते. निराशा आणि अंधकारमय जीवनाने त्यांना ग्रासलेले असते. परंतु, काही सामाजिक संस्था एचआयव्ही बाधितांच्या जीवनात प्रकाशाचा किरण बनण्याचे काम करत असतात. बीड जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि प्रशासनाने एचआयव्ही बाधितांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. शहरात तब्बल 21 HIV पॉझिटिव्ह जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. अनोखा विवाह सोहळा बीडमध्ये एचआयव्ही संसर्गित 21 जोड्यांचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. बीडमधील व्यापारी महासंघाने या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला. तर हेल्थ केअर कमुनिटी ऑफ पॉझिटिव्ह पिपल्सच्या विहान प्रकल्पांर्गत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैष्णवी पॅलेस मंगल कार्यालयामध्ये शाही थाटात या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. बीडकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी देखील लावली.
गत सहा वर्षांपासून परंपरा गेल्या सहा वर्षापासून बीड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित वर आणि वधू यांचा विवाह सोहळा पार पडत आहे. सुरुवातीला या विवाह सोहळ्यामध्ये पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. तेव्हाच या उपक्रमाची सुरुवात झाली. यंदा तब्बल 21 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. त्यामुळे या जोडप्यांना जगण्याची नवी उमेद मिळणार आहे. लेकींचा सन्मान! ग्रामपंचायतीकडून मुलींच्या नावे एफडी तर नवरीला मिळणार माहेरची साडी, Video जीवनावश्यक वस्तूंची भेट या सोहळ्याची संपूर्ण तयारी व्यापारी महासंघ आणि सहकारी संस्थांनी केली. नव दाम्पत्यांना विवाहासाठी आवश्यक मणी मंगळसूत्रही देण्यात आले. तसेच नव्याने आयुष्याची सुरुवात करणाऱ्या नवविवाहितांना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. या विवाह सोहळ्याला वधू-वरांच्या आप्तेष्ठांबरोबरच बीडच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. बीडकरांनीही नवदाम्पत्यांना भरभरून आशीर्वाद दिले.