बीड, 30 डिसेंबर : मागच्या 4 महिन्यांपासून शिवसेनेत दुफळी पडल्यापासून कार्यकर्त्यांच्या मारहाणीचे प्रकार समोर येत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने शिवसैनिकांमध्ये तुफान राडा होताना पहायला मिळत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील राड्याची घटना ताजी असताना आता बीडमध्ये प्रकार पहायला मिळाला आहे. युवासेना बीडच्या तालुका प्रमुखाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र लिहत व्यथा मांडली आहे.
बीडमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या कारणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पत्र लिहले आहे. युवासेनेचे स्थानिक विभागीय सचिवाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत असा पत्रात उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यासा परवाणगी द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
हे ही वाचा : ‘मविआ’मध्ये मतभेत आहेत का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं म्हणाले अजित पवार…
ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यापासून युवासेनेमध्ये अंतर्गत वाद समोर आला आहे. अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता माजली आहे. दरम्यान अशा आशयाचे पत्र युवासैनिकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लिहल्याने ठाकरे गटातील अंतर्गत बंडाळी समोर आली आहे.
शिवसेना भवन, सामना वर शिंदे गटाला ताबा मिळवता येईल?
शिवसेना पक्षावर दावा ठोकल्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेतल्या शिवसेना भवानावर ताबा मिळवला आहे, यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवन, मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखा आणि सामना या वृत्तपत्रावर दावा सांगणार का? असं प्रश्न उपस्थित होत आहे, त्यासाठी या वास्तूंची मालकी आणि कायदेशीर बाजू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबईमध्ये शिवसेनेच्या जवळपास 480 पेक्षा जास्त शाखा आहेत. दादर शिवाजी पार्कसारख्या प्राईम लोकेशनवर शिवसेना भवन आहे. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. शिवाई ट्रस्टचं मुख्य कार्यालय शिवसेना भवनमध्येच आहे. शिवाई ट्रस्टवर उद्धव ठाकरे , रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि दिवाकर रावते हे ट्रस्टी आहेत.
हे ही वाचा : ‘मविआ’मध्ये पुन्हा मतभेद? ‘त्या’ प्रस्तावाची अजित पवारांना माहितीच नाही!
शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना हे वृत्तपत्र आणि मार्मिक हे साप्ताहिक प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येतं. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार या कंपनीवर सध्या दोन बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. संजय रामचंद्र वाडेकर आणि विवेक तातोजीराव कदम या दोन व्यक्ती प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत.
2018 पर्यंत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे डायरेक्टर पदावर होते, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला. प्रबोधन प्रकाशनमध्ये वाडेकर आणि कदम हे डायरेक्टर असले तरी कंपनीचे सर्वाधिक शेअर ठाकरे कुटुंबाकडेच असल्याचं सांगितलं जातं.