बीडमध्ये अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू
बीड, 09 जून : बीडच्या अंबाजोगाई शहराजवळील सनई परिसरामध्ये, भरधाव कार झाडावर आढळून भीषण अपघात झालाय. यामध्ये अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील दोन डॉक्टर जागीच ठार झाले आहेत. डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते अशी मयत डॉक्टरांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन्ही डॉक्टर कारने धारूरहुन अंबाजोगाईकडे जात होते. यावेळी भरधाव वेगातील कारवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर गाडी आदळली. या अपघातात डॉक्टर प्रमोद बुरांडे आणि रवी सातपुते दोघेही गंभीर जखमी झाले होते. समृद्धी महामार्गावरून जाण्याआधी हे वाचा, अपघात रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं पण ड़क्टरांनी प्रमोद बुरांडे यांना मृत घोषित केलं. तर रवी सातपुते यांची उपचारावेळी प्राणज्योत मालवली. समृद्धीवर अपघातात तिघांचा मृत्यू समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. कार दुभाजकाला धडकून झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अहमदनगरहून नागपूरच्या दिशेने जात असताना निधोना गावाजवळ ही घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका पुरुषासह दोन महिलांचा समावेश होता.