अजित पवार
बीड, 21 एप्रिल : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अद्याप चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव यावरून मी हे सांगत आहे असंही प्रकाश सोळुंके म्हणाले. बीडच्या माजलगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रकाश सोळंके पुढे बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर भाजप महाराष्ट्रात काही ना काही चमत्कार करेल. त्यामुळे अजित दादांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही काहीतरी शिजत असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिले आहेत. यामुळें पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुलढाण्यात ‘मविआ’त फूट; काँग्रेस, राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला मोठा धक्का यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले, की सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे, असं होणार तसं होणार, ते बोलणारा थांग पत्ता लागून देत नाही, ते काय होणार ? पण होणारचं आहे, जे व्हायचंय ते होणारचं आहे. महाराष्ट्रात जी चर्चा आहे ते होणारचं आहे, त्यांच्याबद्दल कुणी मनामध्ये शंका आणू नये.
राजकारणाचं घडामोडीचे काय व्हायचंय ते होवो. मी गेल्या 15 दिवसांपासून मुंबईला गेलो नाही, माझी कुणाशी चर्चा झाली नाही. परंतु 35 वर्षाच्या राजकारणानंतर , राजकारणाचं काय होणं अपेक्षित आहे ? याची जाण मला आहे.म्हणून मी स्टेटमेंट दिलं. मात्र निश्चितचं काहीना काही भूकंप नक्कीच होण्याची परस्थिती आहे दुर्दैवाने महाराष्ट्रात आज परस्थिती अशी निर्माण झालीय, स्थिर राज्य आणि पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला असा काहीना काही चमत्कार महाराष्ट्रात करावा लागणार आहे असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी बीडच्या माजलगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून केलं आहे. दरम्यान या अगोदरही प्रकाश सोळुंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी एक प्रकारे राज्यात पुढच्या काही दिवसात, मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले आहेत.