JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MPSC Success Story: बँकेतील नोकरी सोडली, शेतकरी कन्या मुलींमध्ये राज्यात पहिली, पाहा Video

MPSC Success Story: बँकेतील नोकरी सोडली, शेतकरी कन्या मुलींमध्ये राज्यात पहिली, पाहा Video

बीड जिल्ह्यातील शेतकरी कन्येने MPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यशाल गवसणी घातली आहे. सोनाली म्हात्रे हिने मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 4 मार्च : मोठी स्वप्न उराशी बाळगून सातत्य, प्रामाणिपणा आणि कष्टांची पराकाष्ठा करून कार्यरत राहिल्यास यश आपल्या गळ्यात विजयाची माळ नक्कीच घालते. असाच काहीसा विश्वास मनाशी बाळगून बीड जिल्हातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनाली अर्जुन म्हात्रे हिने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी तर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यात मुलींमध्ये सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. हे यश सलग दुसऱ्यांदा संपादन केल्याने तिच्या या गगन भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

2020 च्या परीक्षेत मुलींमध्ये तिसरी सोनाली म्हात्रे हिने या पूर्वी 2020 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत राज्यात मुलींमध्ये तिसऱ्या क्रमांक पटकावला होता. उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली म्हात्रे हिने 2021 च्या गुणवत्ता यादीनुसार दुसऱ्यांदा यशला गवसणी घातली आहे. सोनाली म्हात्रे यांचा यांचा जन्म बीड जिल्हातील ईरला मजरा या छोटेखानी गावात झाला. कॉम्पुटर सायन्स मध्ये इंजिनियरिंग केलेल्या सोनालीने काही काळ बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उपव्यवस्थापक म्हणून देखील काम केले. दरम्यानच्या करोना काळात हातातील नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्यात मुलींमध्ये तिसऱ्या क्रमांकास पात्र ठरली. MPSC Success Story: आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशासकीय सेवेत; नाशिकच्या दुर्गा देवरेचा पाहा प्रेरणादायी प्रवास, Video बँकेतील नोकरी सोडून केला अभ्यास माझे वडील हे शेतकरी असून मी सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठे झाले. माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने माझे इंजिनियर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माझ्या लग्नानंतर मी बँकेमध्ये देखील काम केले. करोना काळात मी जॉब सोडून स्पर्धा परीक्षांकडे वळले आणि 2020 मध्ये एमपीएससी परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. तेव्हा दोनच पदे रिक्त असल्याने मला क्लास टू चे पद घ्यावे लागले. यंदा मात्र 2021 साली झालेल्या एमपीएससी परीक्षेसाठी मी ठरवून अभ्यास केला आणि आता आलेल्या निकालानुसार मी राज्यात महिलांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे, अशी भावना सोनाली म्हात्रे यांनी व्यक्त केली. MPSC Success Story: वडील शेतकरी, जालन्याचा शशिकांत क्लास वन अधिकारी!, पाहा Video आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संधी माणसाने स्वप्न बघणे कधीही सोडू नये. स्वप्नांचा पाठलाग केल्यास एक दिवस यश नक्की हाती लागत असतं. प्रामाणिकपणा, सातत्यता, कष्ट करण्याची तयारी व स्वतःला झोकून देत केलेले प्रयत्न आपल्याला ध्येय गाठण्यास पूरक असतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना प्रयत्न सोडू नका. आपल्यातील मर्यादा आणि क्षमता ओळखा या वाटेत अपयश जरी आले तरी खचून जाऊ नका. यश हाती आले नाही तरी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून अनेक पर्याय या निमित्ताने उपलब्ध होत असतात. यश मिळवण्याच्या अनेक संधी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मिळत असतात. मात्र ध्येयाचा मार्ग सोडू नका, असा सल्ला सोनाली म्हात्रे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या