मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MPSC Success Story: आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशासकीय सेवेत; नाशिकच्या दुर्गा देवरेचा पाहा प्रेरणादायी प्रवास, Video

MPSC Success Story: आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशासकीय सेवेत; नाशिकच्या दुर्गा देवरेचा पाहा प्रेरणादायी प्रवास, Video

X
MPSC

MPSC Result 2021: राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरेने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.

MPSC Result 2021: राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरेने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी

    नाशिक 4 मार्च : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकचं नाव सातासमुद्रा पार घेऊन जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरेने एमपीएससी परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. दुर्गा लवकरच प्रशासकीय सेवेत रूजू होणार आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

    आंतरराष्ट्रीय धावपटू ते उपजिल्हाधिकारी 

    दुर्गा ही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वाझगावची रहिवासी आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कुटूंब नाशिकमध्ये स्थायिक असल्यामुळे दुर्गाचं संपूर्ण शिक्षण हे नाशिक शहरात झाल आहे. तिने पॉलिटिकल सायन्समधून आपल ग्रॅज्युएशन पूर्ण केल आहे. दुर्गाला लहानपणापासूनच खेळाची फार आवड होती. वडील आणि मोठा भाऊ स्पोर्ट्समन असल्यामुळे तिला घरातच खेळाचं बाळकडू मिळालं. ॲथलेटिक्समध्ये सहभागी होत तिने विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यात तिला यश ही मिळू लागलं.

    बघता बघता तिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावपटू होण्याचा बहुमान मिळवला. आतापर्यंत तिने 40 राष्ट्रीय तर 4 आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे. खेळात प्राविण्य मिळवत असताना तिला शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती आणि त्यानुसार तिने एमपीएससी परीक्षा देण्याचं ठरवलं. मात्र खेळाचा सराव त्यात परीक्षेचा अभ्यास हे सर्व करत असताना तिने अनेक संकटांना तोंड दिल मेहनत कायम ठेवली. खेळ आणि अभ्यासाची योग्य सांगड घालत तिने एमपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे.

    दररोज आठ ते दहा तास अभ्यास

    खरंतर खेळाडू म्हटलं की एका जागेवर बराच वेळ बसून अभ्यास करणे अनेक खेळाडूंना जमत नाही. मात्र, मी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार खेळ सांभाळून दिवसभरात जवळपास आठ ते दहा तास अभ्यास मी करत होते. विविध नोट्स काढून मार्गदर्शन घ्यायची. एम ए पदवीत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पूर्णतः फोकस हा खेळ आणि एमपीएससी कडे वळवला होता आणि त्यानुसार मी नियोजनबद्ध अभ्यास करत होते. माझ्या या यशामध्ये आई-वडील आणि मोठ्या भावाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे कारण या काळात त्यांनी मला चांगलं पाठबळ दिलं आणि त्यामुळेच मी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले, असं दुर्गा देवरे हिने यशाबद्दल सांगितले आहे.

    MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी! Video

    स्पर्धा परीक्षा देताना प्लॅन बी रेडी ठेवा

    स्पर्धा परीक्षा अनेक तरुण देत असतात आणि पहिल्याच प्रयत्नात काहीना यश मिळत नाही. मग काही जण निराश होतात. हाताश होतात. आता जणू आपल्याला यश मिळू शकणार नाही अशी भावना अनेकांची होते मग अनेक जण टोकाचे पाऊल देखील उचलतात. मात्र, स्पर्धा परीक्षा देताना आपण प्लॅन बी हा रेडी ठेवला पाहिजे. माझ्या हातामध्ये प्लॅन बी रेडी होता तो माझा खेळ कारण मी ठरवलं होतं मला एमपीएससी तर उत्तीर्ण व्हायचं आहे. मात्र, खेळ देखील माझा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही परीक्षा देताना मी आजिबात टेन्शन घेतलं नाही. यश जरी मिळालं नसतं तरी मी माझा प्लॅन बी रेडी ठेवला होता. त्यामुळे प्रत्येकाने हे करणं गरजेचं आहे, असंही देवरे हिने सांगितले.

    First published:
    top videos

      Tags: Local18, MPSC Examination, Nashik, Success story