JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पैशाच्या वसुलीसाठी सावकाराचे शेतकऱ्यासोबत धक्कादायक कृत्य, घराबाहेर बोलवलं अन्.., बीडमध्ये खळबळ

पैशाच्या वसुलीसाठी सावकाराचे शेतकऱ्यासोबत धक्कादायक कृत्य, घराबाहेर बोलवलं अन्.., बीडमध्ये खळबळ

खासगी सावकारामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या गळ्याला आतापर्यंत फास लागला आहे. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 16 मार्च, सुरेश जाधव :  खासगी सावकारामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या गळ्याला आतापर्यंत फास लागला आहे. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. पेरणीसाठी सावकाराकडून व्याजानं पैसे घेणं शेतकऱ्याच्या जीवावर बेतलंय. सावकारानं पैशाच्या वसुलीसाठी तरुण शेतकऱ्याला घरून उचलून आणत भररस्त्यात जबर मारहाण केली. शेतकऱ्याला लोखंडी रॉड आणि फायटनं मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जखमी शेतकऱ्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकऱ्याला आश्रू अनावर  यावेळी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला देखील धमकावण्यात आलं आहे. आम्ही याला मारून टाकू, कोणी मध्ये येऊ नका आमचं कोणी काही करू शकत नाही. असं म्हणत या शेतकऱ्याला पुन्हा सिमेंटच्या रस्त्यावर आपटण्यात आलं. आपली व्याथा सांगताना शेतकऱ्याला आश्रू अनावर झाले. रोहित विश्वनाथ भडके वय 30 वर्ष असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. दहा टक्के व्याजाने पैसे  शेतकरी रोहित भडके यांनी त्यांच्या ओळखीच्या बाळू काटकर या  सावकाराकडून 30 हजार रुपये व्याजाने घेतले होते. सुरुवातीला रोहित भडके यांना पाच रुपये टक्क्याने हे पैसे देण्यात आले होते. मात्र महिनाभरातच पैशाच्या व्याजाचा दर दुप्पट करण्यात आला. तीस हजार रुपयांच्या बदल्यात भडके दर महिन्याला सावकाला तीन हजार रुपये द्यायचे. मात्र गेल्या तीन चार महिन्यांमध्ये त्यांना पैसे देणं शक्य झालं नाही. संतापजनक! त्याला सोडू नका, फाशी द्या; चिठ्ठी लिहून कोल्हापुरात तरुणीनं संपवलं आयुष्य जाचाला कंटाळून घर सोडले  पैसे थकल्यानं सावकाराच्या जाचाला कंटाळून रोहित भडके हे घर सोडून निघून गेले होते. मात्र ते  घरी आल्यानंतर काल सकाळी सावकार बाळू काटकरसह अन्य 4 जणांनी शेतकरी रोहित भडके यांना गोड बोलून घरून उचलून आणलं. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करण्या आली. आता केस माघारी घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप भडके यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या