JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुम्हाला घरी कुत्रा पाळायचा आहे? मनस्ताप टाळण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी, Video

तुम्हाला घरी कुत्रा पाळायचा आहे? मनस्ताप टाळण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी, Video

कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणूनच ओळखला जातो. श्वान पाळताना अगोदर काही बाबी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 10 एप्रिल- पशुपालन हा आपल्याकडे कृषीपुरक व्यवसाय मानला जातो. पशुपालनाचे विविध हेतू असतात. दुधासाठी गाय, म्हैस, मांसासाठी शेळी, मेंडी, वाहतुकीसाठी घोडा, गाढव, उंट, हत्ती असे प्राणी फार पूर्वीपासून पाळले जातात. कुत्रा हा सुद्धा एक प्रमुख पाळीव प्राणी असून राखणदारीसाठी तो पूर्वापार पाळला जात आहे. अलिकडे श्वान पालनाची जणू फॅशन झाली असून गावासह शहरातील लोकही विविध जातीचे श्वान आवर्जुन सांभाळत आहेत. बीड जिल्ह्यातही अनेक श्वानप्रेमी आहेत. बीड जिल्ह्यात वाढली श्वान पालकांची संख्या गेल्या चार वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये श्वान पालनाचे प्रमाणा कमी होते. मात्र त्यानंतरच्या काळात हे चित्र हळूहळू बदलत गेले आहे. प्रत्येकालाच आपल्या घरात एखादा श्वान सांभाळण्याची इच्छा होत आहे. विशेष म्हणजे आता देशी श्वानासोबतच परदेशी जातींच्या श्वानांना मोठी मागणी आहे. त्यामुळे श्वान पालनही व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. मात्र, श्वान निवडताना काहींची फसगत होते आणि त्याचा पश्चाताप सहन करावा लागतो.

श्वानांची निवड कशी करावी? योग्य श्वानांची निवड करणे हे आपल्या घराच्या किंवा फ्लॅटच्या आकारावर अवलंबून असते. शिवाय आपल्या परिसरातील नागरिकांना या श्वानाचा कुठल्याही त्रास झाला नाही पाहिजे. यावर देखील काही गोष्टी अवलंबून असतात. बीड येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन रमण देशपांडे यांनी श्वानांची निवड कशी करावी याबद्दलच माहिती दिली आहे. देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, अनेजण काही दिवस श्वान पाळतात आणि नंतर सोडून देतात. असं करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे श्वानाची निवड योग्य प्रकारे न करणे होय. संभाजीनगरमधील श्वानांमध्ये बळावतोय गंभीर आजार, जीवघेणा धोका टाळण्यासाठी ‘ही घ्या काळजी, Video श्वान निवडण्यापूर्वी या गोष्टी आहेत आवश्यक बीड सारख्या जिल्ह्यामध्ये जरी जागेची कमतरता नसली तरी आज शहारात फ्लॅट सिस्टीम आलेली आहे. तर काही ठिकाणी स्वतंत्र रो हाऊस जरी असले तरी त्या परिसरातील नागरिकांना आपण पाळलेल्या श्वानाचा त्रास न होणे यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपण रो हाऊस किंवा फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर बिगल पग, लेब्रा डॉग, टॉयपॉम, याच श्वानांची आवर्जून निवड करावी. जेणेकरून त्याच्या पालनपोषणासाठी अडचणी येणार नाहीत. शिवाय हे श्वान म्हणावे असे अॅट्रॅक्टिव्ह नसतात. वर्दळीच्या ठिकाणी पाळू नयेत हे श्वान सर्वात अॅट्रॅक्टिव्ह असणारे श्वान पाळण्याचे अनेकांना अधिक आवड असते. मात्र कंजस्टेड एरिया किंवा वर्दळीच्या परिसरामध्ये श्वानपालन करताना काळजी घ्यावी लागते. अनेकदा श्वानांनी हल्ल्या केल्याच्या घटना बीड जिल्ह्यात समोर आल्या आहेत. त्यामुळे फ्लॅट किंवा रो हाऊस असणाऱ्या ठिकाणी मस्टीप, बूली, जर्मन शेफर्ड या श्वानांचे पालन शक्यतो टाळावे. जेणेकरून एखादा चुकीचा प्रकार घडणार नाही. Beed News: नोकरी सोडून सुरू केलं श्वान पालन, लाखोंच्या उलाढालीतून कमावतोय मोठा नफा, Video शेतात कोणते श्वान पाळावेत? अनेकदा जास्त अॅग्रेसिव्ह असणाऱ्या श्वानांचे कमी जागेमध्ये पालन केल्याने एखादा चुकीचा प्रकार देखील घडू शकतो. त्यामुळे अनेकांना त्यांची शेती किंवा व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी अग्रेसिव्ह असणाऱ्या श्वानांची आवश्यकता भासते. अशा ठिकाणी पीटबूल, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, मस्टीप, हास्की अशा प्रकारच्या श्वानांची निवड करू शकता. अशाप्रकारे तुम्हाल जर श्वान पालन करायचे असेल तर वरीला सल्ला तुमच्या नक्कीच फायद्याचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या