JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Child marriage : एकाच मुलीचा तीन वेळा लावला बालविवाह; बीडमधील धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ

Child marriage : एकाच मुलीचा तीन वेळा लावला बालविवाह; बीडमधील धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ

Child Marriage : बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अशात एका मुलीचा तब्बल तीनवेळा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात

एकाच मुलीचा तीन वेळा लावला बालविवाह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 8 जून : बालविवाहाचा अतिशय धक्कादायक प्रकार बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आला आहे. एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह लावल्याची धक्कादायक माहिती चाईल्ड लाईनने समोर आणली आहे. 14 व्या वर्षी पहिला आणि 17 व्या वर्षी तिसऱ्यांदा या मुलीचा बालविवाह लावण्यात आला असून ही धक्कादायक घटना बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये समोर आली. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी चाईल्ड लाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केली. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ऊसतोड कामगाराच्या 14 वर्षीय मुलीचा, 22 डिसेंबर 2020 ला पहिल्यांदा विवाह उखंडा येथील तरूणाशी झाला होता. परंतु मुलगी सासरी नांदलीच नाही अन् अवघा 10 महिन्यातच ही मुलगी माहेरी परतली. नंतर या मुलीचा दुसरा बालविवाह 18 फेब्रुवारी 2022 रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रूई गावातील तरुणाशी लावून देण्यात आला होता. या ठिकाणीही ती मुलगी नांदली नाही. तर आता तिसरा विवाह मुलीच्या घरी काल 7 जून 2023 रोजी दहीवंडी येथील 34 वर्षांच्या तरूणाशी झाला. सध्या मुलीचे वय 17 वर्षाचे आहे. ही माहिती चाईल्डच्या हेल्पलाईनवर मिळताच त्यांनी तिथे धाव घेतली. अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत हे तिन्ही प्रकरणे समोर आली आहेत. बीड दरम्यान याप्रकरणी बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाचा - आईच्या प्रियकरासोबत दोन भावांचं धक्कादायक कांड; पोलिसांनी 16 तासांत लावला छडा राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह दरम्यान राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत आहेत. या बालविवाहामुळे अल्पवयीन मुलींना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे हे होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या मोहीम हाती घेतंय. मात्र, तालुका पातळीवर असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचेच या होणाऱ्या बालविवाहांना पाठबळ आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली, तरचं ही बालविवाहाची समस्या कमी होऊ शकेल. अन्यथा बालविवाहाची संख्या आणखी वाढू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या