बीड भीषण अपघात
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 3 जुलै : दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक भीषण अपघाताची घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. मोटारसायकल आणि कारच्या भीषण अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड शहराजवळ हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात अपघातग्रस्त दुचाकी वाहनाने पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाले आहे. मोटार सायकल आणि कारची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बीड शहराजवळील मसोबा फाटा येथे घडली. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला यात दुचाकी जळून खाक झाली आहे. शिरूर येथील कालिंका देवी महाविद्यालयातील दोन शिक्षक आज सकाळी ड्युटीसाठी शिरुरकडे जात होते. परंतु, बीड तालुक्यातील मसोबा फाटा परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर आणि प्राध्यापक गव्हाणे अंकुश साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.