JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: आता मुले वाचतील कायदा, बीड पोलीस घेणार स्पेशल क्लास, Video

Beed News: आता मुले वाचतील कायदा, बीड पोलीस घेणार स्पेशल क्लास, Video

बीड जिल्हा पोलीस दलाने सायबर गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे. ही पुस्तके शाळांमध्ये वाटण्यात येणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 20 फेब्रुवारी: लहान मुले आणि महाविद्यालयीन तरुणांकडून नकळतपणे एखादी कृती घडते आणि कायद्याचे उल्लंघन होते. त्यामुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. असे प्रकार घडू नयेत म्हणून बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलीस प्रशासनाने दोन पुस्तके आणि सात माहिती पत्राकांची निर्मिती केली आहे. त्यामुळे मुलांना कायद्याचे ज्ञान मिळणार आहे. सायबर गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. सोप्या आणि सरळ भाषेमध्ये विद्यार्थ्यांना कायद्याविषयी माहिती व्हावी यासाठी पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये या पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले आहे.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा ? यासंदर्भाची मार्गदर्शन करणारे 50 पानाची पुस्तिका पोलीस दलाने आणली आहे. या पुस्तिकेच्या आतापर्यंत 3 हजार प्रति छापण्यात आल्या आहेत. या पुस्तिकेत वाढत्या सायबर गुन्ह्यांची चिंता, सायबर बुलिंग, सायबर ग्रुमिंग, ऑनलाइन व्यवहार घोटाळे, ऑनलाइन गेमिंग, ई-मेल द्वारे फसवणूक, सायबर गुन्ह्यांचे संकट यावर माहिती देण्यात आली आहे. बीडच्या तरूणाला जगप्रसिद्ध फेलोशिप, ZP शाळा ते इटली केला प्रवास Video महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व त्यांना कायदेविषयक माहिती टिप्स, आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती सांगणारे शंभर पानांचे स्वयंसिद्धा पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तकाच्या 5 हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. हे पुस्तक सात विषयांवर आधारित आहे. पुस्तकात महिलांसंबंधीचे कायदे व नियम, भारतीय दंड विधान, गर्भपाता संबंधिचे कलम, विनयभंग, ऍसिड हल्ला, शासनाच्या महिलाविषयक इतर योजना, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 आदी माहिती देण्यात आली आहे. Beed news: नातवासोबत आजी-आजोबाही जाणार शाळेत; पाहा कशासाठी भरणार विशेष वर्ग, Video विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान होण्यासाठी उपयुक्त बीड जिल्हा पोलीस दलातर्फे दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे. त्यामधील स्वयंसिद्धा या पुस्तकात महिलांविषयी कायदे, टिप्स, आपत्कालीन हेल्पलाइन देण्यात आली आहे. तर सायबर क्राईम पासून बचावासाठी माहिती दुसऱ्या पुस्तकात देण्यात आली आहे. दोन्ही पुस्तके विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान होण्यासाठी उपयुक्त आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या