JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गाव तसं चांगलं, वानरासाठी एकवटलं, माणुसकीचं दर्शन घडवणारा VIDEO

गाव तसं चांगलं, वानरासाठी एकवटलं, माणुसकीचं दर्शन घडवणारा VIDEO

अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वानराला पाहून लिंबागणेश गावकऱ्यांना बजरंगबलीची आठवण झाली. पाहा गावकऱ्यांनी काय केलं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 20 जुलै: एखादा अपघात झाल्यास मदतीसाठी धावणं हा माणुसकीचा धर्म मानला जातो. बीडमधील लिंबागणेश गावकऱ्यांनी भूतदयेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. एका अपघातात वानराचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याच्या बचावासाठी प्रयत्न केले. मात्र अपयश आलं. वानराचा संबंध बजरंग बलीशी असल्याने गावकऱ्यांनी वानराची विधिवत अंत्ययात्रा काढली आणि हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कारही केले. गावकऱ्यांच्या या अनोख्या माणुसकीची आणि हनुमान भक्तीची सर्वत्र चर्चा आहे.

नेमकं घडलं काय? बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे बुधवारी सकाळी 8 वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू झाला. त्यानंतर लिंबागणेश येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि त्या वानराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वानराचा मृत्यू झाला. तिच्या डरकाळीने जंगल शांत होतं, ती बछड्यांसह परत आली, किक्रेटचा देवही पडला होता प्रेमात! गावकऱ्यांनी काढली अंत्ययात्रा वानराच्या अपघाती मृत्यूनंतर लिंबागणेश गावातील भजनी मंडळ व रामभक्त ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी गावच्या वेशीपासून गावातील हनुमान मंदिरापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात हरीनामाचा जयघोष करत अंत्ययात्रा काढली. त्यानंतर हनुमान मंदिराच्या बाजूला हिंदू धर्माप्रमाणे विधिवत अंत्यसंस्कार केले. त्याठिकाणी समाधी बांधण्याचा संकल्प करत चांदीपाटाच्या फुलाचे रोपटे लावले. मोठ्या जड अंतःकरणाने रामभक्तांनी वानराला निरोप दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या