जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तिच्या डरकाळीने जंगल शांत होतं, ती बछड्यांसह परत आली, किक्रेटचा देवही पडला होता प्रेमात!

तिच्या डरकाळीने जंगल शांत होतं, ती बछड्यांसह परत आली, किक्रेटचा देवही पडला होता प्रेमात!

तिच्या डरकाळीने जंगल शांत होतं, ती बछड्यांसह परत आली, किक्रेटचा देवही पडला होता प्रेमात!

भानुसखिंडी मादी आणि तिच्या 3 शावकासोबतचा मौसमी वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्यात दंगा मस्ती करताना दिसत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 20 जुलै : हमखास व्याघ्रदर्शनासाठी तांडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध असून तांडोबा हे वाघांचे अधिवास असलेले भारतातील नंदनवनच म्हणावे लागेल. व्याघ्रदर्शन आणि येथील समृद्ध जंगलाच्या ओढीने वर्षाकाठी येथे देश-विदेशातील लाखो पर्यटकांची पावले आपसूकच या ठिकाणी वळतात. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात आहे. ताडोब्यातील नवेगाव रामदेगी, अलिझांझा आणि निमधेला या बफर क्षेत्रात दिसणाऱ्या भानुसखिंडी मादी आणि तिच्या 3 शावकासोबतचा मौसमी वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्यात दंगा मस्ती करताना दिसत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नुकतेच हा व्हिडीओ वन्यजीवप्रेमी दीप काठीकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. महाराष्ट्रातील पट्टेदार वाघोबांचं राज्य म्हणजेच चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प होय. वाघाच्या एक झलक दर्शनासाठी सर्वांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे हा सर्वात मोठा आणि सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे. वर्षाकाठी येथे देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. इथल्या जंगलाने क्वचितच कुणाला निराश केलं असेल. नुकतेच वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी भानुसखिंडी मादी आणि तिच्या शावकांचा एक व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वाघिणीचे प्रचंड पर्यटकांना आकर्षण ताडोब्यातील नवेगाव रामदेगी या बफर क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर येथील भानुसखिंडी वाघिणीचे प्रचंड आकर्षण पर्यटकांना आहे. क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रविना टंडन अश्या अनेक दिग्गजांना तिने आपल्या एक नजरेत प्रेमात पाडलेले आहे, असं वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी सांगितले. तिला 4 शावक होती, सध्या तिच्यासोबत फक्त 3 दिसत आहेत भानुसखिंडी वाघिणीच्या शावकांचा पिता छोटा मटका हा नर आहे जो सुमारे 50 किलोमीटर जंगलावर राज्य करतो. आम्ही ज्या वेळी जंगल सफारी सुरू केली त्या दरम्यान आम्हाला वाघांच्या गुर्गुरण्याचा मोठा आवाज आला. भानुसखिंडीने आपल्या शावकाना आवाज देण्यासाठी तिने हा केलेला तो आवाज होता. या आवाजाने जंगलातील शांतता क्षणात भंग पावली आणि आवाजाचा वेध घेत त्या दिशेने आम्ही गेले असता आम्हाला हा क्षण कॅमेरात कैद करता आला, अशी माहिती दीप काठीकर यांनी दिली.

Snake Bite : साप चावल्यावर घाबरु नका, ‘या’ उपचारानंतर वाचेल तुमचा जीव, Video

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला. यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात वाघांची संख्या 3 हजार 167 वर पोहचली आहे. तर 2022 च्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात कमीत कमी वाघांची संख्या ही 390 च्या घरात पोहचली आहे. व्याघ्रगणनेच्या अनुमनानुसार ही संख्या 466 च्या पुढे आहे. त्यात एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमीत कमी वाघांची संख्या 87 आहे. तर 87-91 वाघ असल्याचा अनुमान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाघांचे अधिवास असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगविख्यात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात