JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / "जे मध्ये येतील त्याला जेसीबी खाली घ्यायचं..", बीडमध्ये अधिकऱ्यांची गुंडागर्दी video

"जे मध्ये येतील त्याला जेसीबी खाली घ्यायचं..", बीडमध्ये अधिकऱ्यांची गुंडागर्दी video

बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात

धमकी देणारा अभियंता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 28 फेब्रुवारी : बीडमध्ये काल एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र, त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात, स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावानं, आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळालं. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे. बीडचा धारूर पंचायत समितीच्या मुजोर अभियंत्याने गुंडालाही लाजवेल अशी धमकी दिली आहे. जो येईल त्याला जेसीबीच्या खोऱ्याखाली घ्या, अशी धमकी त्यांनी दिली आहे. रस्त्याचे काम चांगले करा म्हणण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना त्यांनी ही धमकी दिली. याप्रकरणी अभियंत्याकडे पिस्तूल धाक दाखवल्याची तक्रारही गावकऱ्याने केली आहे. जेसीबीच्या खोऱ्या खाली घे त्यांना पुरून टाक, अशी धमकी गावकऱ्यांना देणाऱ्या शासकीय अभियंत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमधील या मुजोर अभियंताच्या धमकीमुळे गावकरी दहशतीखाली आहेत. एखाद्या टपोऱ्या गुंडालाही लाजवेल, अशी धमकी चक्क धारूर पंचायत समितीच्या अभियंत्याने दिली आहे. धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम आणि मुरमाचे काम धनगर वस्ती रोडवर सुरू आहे. रस्त्याचे काम चांगले करावे, अशी मागणी करण्यासाठी गावकरी गेले असतां त्यांची समजूत काढण्याऐवजी मुजोर अभियंता हा ग्रामस्थांना धमकी देत म्हणाला, “यांना जेसीबीच्या खोऱ्याखाली घे खडा खोदून त्यांना पुरून टाका.. एवढ्यावर न थांबता चप्पल घेऊन लोकांवरती धावला देखील. या धमकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

कृषी महोत्सवात वेगळीच ‘लावणी’, शेतकरी आत्महत्येचं भान विसरून अधिकारी ‘झिंगाट’, Video सय्यद मुजाहिद, असे या मुजोर अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे तक्रारीत अभियंत्याकडे पिस्तूल असून पिस्तुलीचा धाकदेखील दाखवत असल्याचे म्हटले आहे. कालच कृषी अधिकाऱ्यांचा कृषी महोत्सवात डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाला. परळीत चूक नसताना तरुणाला बेदम मारहाण केल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ आणि त्यानंतर आता चक्क गावकऱ्यांना जेसीबीच्या खोऱ्याखाली घेऊन पुरून टाका म्हणणारा अधिकाऱ्यांचा व्हिडिओ समोर आल्याने नेमकं बीड मधील अधिकाऱ्यांना झालंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. यांसारख्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच धारूर तालुक्यातील जहांगीर मोहा येथील रस्ता कामावर घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पंचायत समितीवर प्रशासक लागल्यापासून अधिकाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली की काय, अशीही चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या