JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News : 3 वेळा अपयश आलं, मोलमजुरी करून केला अभ्यास अखेर शेतकऱ्याचा मुलगा झाला PSI video

Beed News : 3 वेळा अपयश आलं, मोलमजुरी करून केला अभ्यास अखेर शेतकऱ्याचा मुलगा झाला PSI video

मोलमजुरी करून अभ्यास करत लक्ष्मण मानेने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 7 जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलंय. बीड जिल्ह्यातल्या रांजणी या छोट्याश्या गावातल्या लक्ष्मण माने या तरुणानेही या परीक्षेत यश मिळवलंय. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  मोलमजुरी करून परीक्षेचा अभ्यास  लक्ष्मण माने याचे प्राथमिक शिक्षण हे गावी झाले. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण गडी येथे पूर्ण केले. त्यानंतर गेवराई येथून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेऊन त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली मात्र लक्ष्मण याची घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्याने घरच्या सोबत मोलमजुरी करून परीक्षेचा अभ्यास केला.

लक्ष्मण याचे वडील शंकर माने यांना अवघे 2 एकर एवढीच शेती आहे. शेतीतून पाहिजे तेवढे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत नाही. म्हणून लक्ष्मण याने  त्याच्या आई-वडिलांसोबत दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून परीक्षेचा अभ्यास केला. त्याला पीएसआय या पदासाठी तीनदा परीक्षेत अपयश देखील आले मात्र चौथ्यांदा आता लक्ष्मणला यश मिळाले आहे.  मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो माझी बारावीची परीक्षा झाल्यानंतर आर्मी भरतीसाठी मी तयारी सुरू केली. त्यामध्ये देखील मला अनेकदा अपयश आले. त्यानंतर मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आणि तिथे मला असे काही सहकारी भेटले की ते नुकतेच त्यांची पीएसआय पदी निवड झाली होती. त्यानंतर माझ्या मनातही ही पीएसआय होण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली आणि आज मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो,असं लक्ष्मण माने सांगतो.

Jalana News : पोराला शेतात राबताना पाहिलं पण नात झाली PSI, शेतकरी आजोबांचे डोळे पाणावले

संबंधित बातम्या

 डोळ्यात आनंदा अश्रू अनावर माझ्या मुलाने पीएसआयची परीक्षा दिली होती आणि मी रोज या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते. मात्र शेतामध्ये खुरपणीला गेले असता त्यावेळी मला कळाले की माझा मुलगा पीएसआय परीक्षेत पास झाला आहे. त्यावेळी माझ्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले, असं आई लता माने यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या