JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / घरात शिरली वाईट शक्ती, शिक्षिकेनं भोंदूबाबाला बोलावलं अन् त्याने 14 तोळे सोन्याचा केला 'कोळसा'

घरात शिरली वाईट शक्ती, शिक्षिकेनं भोंदूबाबाला बोलावलं अन् त्याने 14 तोळे सोन्याचा केला 'कोळसा'

हा कलश त्या कुटुंबीयांच्या हाती देत 12 ते 13 वर्ष हा कलश उघडू नका अन्यथा अनर्थ होईल, असंही सांगितलं. मात्र या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी कलश उघडून पाहिला….

जाहिरात

(घरातून 14 तोळं सोनं गायब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 14 जून : आत्तापर्यंत आपण अशिक्षित अज्ञानी लोकांना भोंदू बाबांनी गंडा घातल्याचं पाहिलं असेल मात्र बीडमध्ये चक्क शिक्षकेलाच घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी सुवर्ण कलश पुजा करायला लावली. पण 2 भामट्यांनी कलशातील तब्बल 14 तोळे सोने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. यावरून सुशिक्षितांना फसवणारे भोंदूंची टोळी नवीन मोडस ऑपरेटिव वापरत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे. अंधश्रद्धेच्या नादाला लागून भोंदू बाबांच्या जाळ्यात अशिक्षित गरीब पीडित लोक असल्यास अनेक प्रकरण आपण पाहिले असतील. मात्र बीडमध्ये एका चक्क शिक्षकेलाच भोंदूंनी जाळ्यात ओढलं आणि घरामध्ये वाईट शक्ती आहे, त्यामुळेच दुखणे मागे लागले आहे. त्यामुळे ती वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी घरात सुवर्ण कलश पूजा करावी लागेल असे सांगून घरात प्रवेश केला. घरातील सर्व सोन्याचे दागिने एका कलशमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्वांना बाहेर पाठवून दिले आणि सोनं असलेल्या कलशच्या ऐवजी दुसराच एक कलश त्याठिकाणी ठेवला. त्यानंतर हा कलश त्या कुटुंबीयांच्या हाती देत 12 ते 13 वर्ष हा कलश उघडू नका अन्यथा अनर्थ होईल, असंही सांगितलं. मात्र या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी कलश उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे दागिन्याऐवजी कोळसा आढळून आला. (Thane : वेटरला ATM कार्ड दिलं आणि त्यानेच घात केला, पोलीसही नेपाळपर्यंत पोहोचले आणि…) त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर 12 जून रोजी संजीवनी हनुमंतराव मेडकर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र लोटके, मिना लोटके (रा. खंडाळा जि. अहमदनगर) या दोघांविरुद्ध कलम 420,406,498 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम वाढवले जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितलं. बीड शहरातील शिक्षकेला दोन भोंदूंनी फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर सुशिक्षित लोकांना देखील आता भोंदू बाबा नवनवीन क्लुप्त्या वापरून जाळ्यामध्ये ओढतात. त्यांची फसवणूक करतात यामुळे 2013 मधे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला जादूटोणाविरोधी कायदा याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य तत्त्वशील कांबळे आणि अशोक तांगडे यांनी केली आहे. (शरीराचे अनेक तुकडे करुनही नराधम सुटणार? सरस्वती हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण) पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेच्या नावाने फसवणाऱ्या विरोधात कायदा कठोर करून त्याची अंमलबजावणी केली जावी अन्यथा सुशिक्षित लोक देखील या जाळ्यामध्ये अडकून बळी पडतात. सुशिक्षित लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढण्यासाठी नवीन मोडस अप्रेंटिस वापरली जात असल्यास देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्य तत्त्वशील कांबळे आणि अशोक तांगडे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या