JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंच्या सभेत व्यत्यय; कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांची पळापळा; नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंच्या सभेत व्यत्यय; कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांची पळापळा; नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेला आज कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, एका प्रकाराने त्यांना भाषण मधेच थांबवावं लागलं.

जाहिरात

उद्धव ठाकरेंच्या सभेत व्यत्यय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 6 मे : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा महाड येथे पार पडली. ठाकरे यांची सभा सुरू झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून फटाके फोडले. बराचवेळ झाला तरी फटाके फुटण्याचं थांबत नव्हते. अखेर उद्धव ठाकरे यांना भाषण थांबवावे लागले. यामुळे पोलिसांचीही पळापळ पाहायला मिळाली. नेमकं काय घडलं? बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये सभा घेतली. मात्र, या सभेला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले. सभा सुरू झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून फटाके फोडण्यात आले. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू होऊनही फटाके वाजण्याचे थांबत नव्हते. अखेर ठाकरे यांना आपलं भाषण मध्येच थांबवावं लागलं. यावेळी सभेला आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांचीही पळापळ पाहायला मिळाली. अखेर पाणी टाकून फटाके विझवण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी देखील फटाक्यांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. फटाके देखील शिवसैनिकांसारखे, एकदा पेटले की थांबत नाहीत. म्हणून शिवसैनिकांना कोणी पेटवु नये नाहीतर हे मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. वाचा - ‘म्हणून मी बारसूत रिफायनरीसाठी पत्र दिलं..’ ‘त्या’ पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर माझी दिशाभूल करण्यात आली : ठाकरे एक पत्र फडकवल जातं, उद्धव ठाकरेंनी दिलं. हो उद्धव ठाकरेंनी लिहिलच होतं पत्र, मी जाहिरपणे सांगतो. कारण मला खोट बोलता येत नाही, खोट बोलण्याची गरज नाही, कारण मी पाप केलेल नाही. मी मुख्यमंत्री असताना नाणारला रिफायनरी होऊ दिली नाही, नंतर मला दिल्लीहुन फोन आले, आता तिकडे गेलेले हे गद्दार माझ्याकडे आले, साहेब हा मोठा प्रकल्प आहे, मोठा आहे पण विनाशकारी असेल तर कोकणात का घेता? तर सांगितले, तिकडे कोणाचा विरोध नाही, वस्त्या नाहीत, गाव नाहीत, पर्यावरणाची हानी होणार नाही, ओसाड जमीन आहे, म्हणून माझ्याकडुन पत्र दिलं गेलं. आता मला अशी शंका येतेय, साधारण हा सिक्वेन्स पाहिलात तर आपलं सरकार पाडलं आणि तिकडून संमती आली किंवा कदाचित तिकडून संमती आली असेल आणि आपलं सरकार पाडल असेल, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या