JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सासरवाडीच्या छळाला कंटाळला; तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल, छ. संभाजीनगरात खळबळ

सासरवाडीच्या छळाला कंटाळला; तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल, छ. संभाजीनगरात खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

सासरच्या छळाला कंटाळून तरुणाचं धक्कादायक पाऊल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 11 मार्च, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने आपलं जीवनं संपवलं. सुनील रघुनाथ जगधने वय 23 वर्ष असं या तरुणाचं नावं आहे. त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो शहरात प्लंबरचं काम करायचा. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तणावातून आत्महत्या?  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुनील  जगधने या 23 वर्षाच्या तरुणाने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तो छत्रपती संभाजीनगरातील एम 2 परिसरातील रहिवासी होता. त्याने झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. सासरच्या मंडळींनी घरी येऊन या तरुणाला शिवीगाळ केली. तसेच त्याची पत्नी आणि चार महिन्यांच्या बाळाला ते घेऊन गेले होते. त्यामुळे सुनील तणावात होता. या तणावातूनच सुनीलने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल  दरम्यान या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप सुनील जगधने याचे वडील रघुनाथ जगधने यांनी केला आहे. वडीलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या